जाहिरात

Ajit Pawar Beed Visit: नातेवाईकांना नो एन्ट्री, रुग्णांचे हाल! अजित पवारांच्या बीड दौऱ्याचा सामान्यांना फटका

Ajit Pawar Beed Visit: रुग्णालयात रुग्णांचा डबा घेऊन देखील दिले जाऊ नव्हते. कुणाची आई, तर कुणाचा लेकरू, तर कुणाची सून रुग्णालयात उपचार घेत होती.

Ajit Pawar Beed Visit: नातेवाईकांना नो एन्ट्री, रुग्णांचे हाल! अजित पवारांच्या बीड दौऱ्याचा सामान्यांना फटका

बीड: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. अजित पवार हे पालकमंत्री झाल्यानंतर तिसऱ्यांदा बीड जिल्हा दौऱ्यावर येत असून,  परळी, अंबाजोगाई, बीड आणि गेवराई या चार मतदारसंघांत अजित पवार ११ तास असणार आहेत. एकीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बीडमध्ये जल्लोषात स्वागत होत असतानाच या दौऱ्यामुळे रुग्णालयातील रुग्णांची मात्र उपासमार झाली आहे. नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर..

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

 उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात अजित पवार बीडच्या शासकीय रुग्णालयाला भेट देण्यासाठी गेले. अजित पवारांच्या याच व्हीआयपी दौऱ्यामुळे रुग्णालयाचे सुरक्षारक्षक आणि पोलिसांनी नागरिकांना सकाळी साडेआठ वाजेपासून रुग्णांच्या भेटीसाठी जाण्यास रोखण्यात आलं. रुग्णालयात रुग्णांचा डबा घेऊन देखील दिले जाऊ नव्हते. कुणाची आई, तर कुणाचा लेकरू, तर कुणाची सून रुग्णालयात उपचार घेत होती.

पण जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवारांचा व्हीआयपी दौरा पाहता पोलीस कुणालाच आतमध्ये सोडायला तयार नव्हते. रुग्णांचे नातेवाईक गयावया करत होते, काहींना अश्रू अनावर झाले. पण दादाचा दौरा म्हटल्यावर बिचारे पोलीस तरी काय करतील. बरं रुग्णांच्या नातेवाईकांना पाच तास रुग्णालयाच्या बाहेर उभं करून देखील अजित पवार त्या कार्यक्रमाला आलेच नाहीत. या प्रकारावरुन रुग्णांच्या नातेवाईकांनी मात्र संताप व्यक्त केला. आमचा पेशंट महत्वाचा आहे की नेत्याचे भाषण असा सवालच यावेळी त्यांनी विचारला.

नक्की वाचा-  Pune News : सुनेची आत्महत्या, छळ केल्याचा आरोप; राष्ट्रवादीच्या नेत्यासह 5 जणांविरोधात गुन्हा दाखल)

दरम्यान, बीडमध्ये आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे राष्ट्रवादीकडून जल्लोषात स्वागत करण्यात आले आहे. दोन दिवसांपूर्वी घडलेल्या शिवराज दिवटे मारहाण प्रकरणानंतर बीडच वातावरण तापले असून, पुन्हा एकदा बीड जिल्ह्यातील गुंडगिरीची चर्चा होत आहे. विशेष म्हणजे अजित पवार यांनी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री स्वीकारल्यानंतर देखील  बीडमधील परळी पॅटर्न काही थांबायला तयार नाही. त्यामुळे आजचा अजित पवारांचा दौरा महत्वाचा समजला जात आहे. 

(नक्की वाचा-  Joe Biden : अमेरिकेच माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना प्रोस्टेट कॅन्सरची लागण, हाडांमध्ये पसरल्याने चिंता)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com