Maharashtra School Closed : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज २८ जानेवारी रोजी सकाळी ८.४५ वाजता झालेल्या विमान अपघातात बारामतीत मृत्यू झाला. त्यांच्या निधनाच्या वृत्तानंतर राज्यभरात शोक पसरला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत बोलताना याबाबत सांगितलं. राज्यात सुट्टी आणि तीन दिवसांच्या दुखवटा त्यांनी जाहीर केला. शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. यादरम्यान शाळेतील विद्यार्थी आणि पालकांमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालं आहे. शाळा तीन दिवस बंद असतील का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. (Deputy Chief Minister Ajit Pawar Death)
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज (२८ जानेवारी २०२६) सकाळी ८.४५ वाजता बारामती येथे झालेल्या विमान अपघातात मृत्यू झाला. त्यांच्या सह सहा जणांचा या अपघातात मृत्यू झाला. ते VTSSK-LJ45 नावाच्या विमानाने प्रवास करीत होते. अपघातात ग्रस्त झालेलं विमान 'प्लॅटिनम एअर' या खाजगी चार्टर्ड कंपनीच्या मालकीचे होतं. जिल्हा परिषद निवडणुकीच्या रॅलीसाठी ते बारामतीला निघाले होते. बारामतीच्या मातीतच त्यांचा दुर्देवी अंत झाला. त्यांच्या अकाली निधनाने अख्खा महाराष्ट्राला जबर धक्का बसला आहे. बारामतीतील प्रत्येक घरात आज शोक व्यक्त केला जात आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले सर्व कार्यक्रम रद्द केले असून ते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोघेही थोड्याच वेळात बारामतीसाठी रवाना होत आहेत. राज्यात आज शासकीय सुटी जाहीर करण्यात आली असून तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) January 28, 2026
महाराष्ट्रात तीन दिवस राजकीय दुखवटा...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (२८ जानेवारी २०२६) राज्यात शासकीय सुट्टी आणि तीन दिवस दुखवट्याची घोषणा केली आहे. याचा अर्थ आज २८ जानेवारी रोजी राज्य सरकारचे सर्व कार्यलयं बंद राहतील. याशिवाय महाराष्ट्रात तीन दिवस राजकीय दुखवटा असेल. २९ आणि ३० जानेवारी रोजी शाळा, कॉलेज आणि सरकारी कार्यालयं सुरू असतील. अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे आजचे सर्व सरकारी कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world