जाहिरात

Thane News: दवाखान्यात साड्यांचे दुकान! एकनाथ शिंदेंच्या योजनेचा ठाण्यातचं फज्जा, घडलं काय?

Thane News:  दवाखान्यात साड्यांचे दुकान! एकनाथ शिंदेंच्या योजनेचा ठाण्यातचं फज्जा, घडलं काय?

रिझवान शेख, प्रतिनिधी: 

ठाणे:  राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्री असताना गोरगरीब आणि अति दुर्बल भागातील रुग्णांना प्राथमिक उपचार (Primary Treatment) मिळावा या उद्देशाने सुरू केलेला महत्त्वाकांक्षी उपक्रम, 'हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना' (Aapla Dawakhana), त्यांच्याच बालेकिल्ला असलेल्या ठाणे शहरात (Thane City) बंद पडल्याचे चित्र समोर आले आहे.

या योजनेअंतर्गत प्रत्येक दवाखान्यासाठी ३० प्रकारच्या चाचण्या (Tests), १०५ प्रकारची औषधे आणि ६६ प्रकारची वैद्यकीय उपकरणे (Medical Equipment) तसेच ४४ प्रकारचे फर्निचर यांना मान्यता देण्यात आली होती. या संपूर्ण योजनेसाठी राज्य सरकारने तब्बल २१० कोटी रुपयांचा निधी देखील दिला होता. ठाण्यात सुमारे ५० 'आपला दवाखाना' केंद्र (Centers) उभारण्याचे ठिकाण निश्चित करण्यात आले होते. मात्र, आता याच योजनेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

Pune Metro 2: पुणेकरांची वाहतूक कोंडीतून मुक्तता होणार? मेट्रो लाईनच्या विस्ताराचे टेंडर लवकरच

दवाखान्याच्या जागी साड्यांचे दुकान

ठाणे शहरात ज्या ठिकाणी 'आपला दवाखाना' सुरू करण्यात आला होता, त्यापैकी एका केंद्रात आता साड्यांचे दुकान (Sari Shop) सुरू झाल्याचे उघड झाले आहे. महत्त्वाचे म्हणजे, मोठा गाजावाजा करत या दवाखान्याचे उद्घाटन करण्यात आले होते. उद्घाटनाचे, ज्यावर खासदार नरेश मस्के (Naresh Maske) आणि तत्कालीन आयुक्त बिपिन शर्मा (Bipin Sharma) यांचे फोटो आहेत, ते बॅनर दवाखान्याच्या बाजूला धुळ खात पडले असल्याचे दिसून येत आहे.

मालकाकडून भाडे थकल्याची माहिती: संबंधित गाळा मालकाने दिलेल्या माहितीनुसार, दवाखाना चालवणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरने (Contractor) भाडे थकवल्यामुळे त्यांनी तो गाळा साडी विक्रेत्याला दिला. दोन वर्षांचे भाडेकरार (Agreement) झाले असताना, पहिल्या वर्षाचे भाडे नियमित मिळाले, मात्र दुसऱ्या वर्षात भाडे योग्यरित्या न आल्याने ते थकीत (Dues) झाले.

(नक्की वाचा- IKEA ची पुण्यात एन्ट्री; मोठी जागा भाड्याने घेतली; भाडं ऐकून थक्का व्हाल!)

भाजपचा आंदोलनाचा इशारा: एकीकडे मुख्यमंत्री शिंदे यांच्या गृहजिल्ह्यातच ही योजना फसल्याचे चित्र असताना, दुसरीकडे स्थानिक राजकारणही तापले आहे. येणाऱ्या काळात जर या 'आपला दवाखाना' केंद्रातील कायद्यात असणाऱ्या परिचारिकांना (Nurses) आणि गाळा मालकांना थकीत भाडे मिळाले नाही, तर महापालिकेवर (Municipal Corporation) मोठे आंदोलन करू, असा इशारा स्थानिक भाजप (BJP) कार्यकर्त्यांनी दिला आहे. प्राथमिक आरोग्य सुविधा पुरवण्याच्या चांगल्या उद्देशाने सुरू झालेला हा उपक्रम अशा प्रकारे अर्ध्यातच बंद पडल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com