VIDEO : अमरावतीच्या चिखलदरा येथे पर्यटकांची जीवघेणी स्टंटबाजी, डोंगराच्या कड्यावर फोटोसेशन

हरिकेन पाईंटवर प्रवेश नसताना देखील काही पर्यटकांची तिथे स्टंटबाजी सुरु होती. तरुण हुल्लडबाजी करून स्वतः चा जीव धोक्यात टाकून खोल दरीच्या अगदी जवळ जाऊन फोटो काढत होते.

जाहिरात
Read Time: 2 mins

शुभम बायस्कर, अमरावती

पावसाळ्यात अनेकांची पावलं पर्यटनस्थळांवर वळतात. मात्र निसर्गरम्य वातावरणाचा आनंद लुटण्याऐवजी अनेक जण हुल्लडबाजी करताना दिसतात. तर काहीजण सेल्फीसाठी जीवघेणी स्टंटबाजी करताना दिसतात. असाच एक प्रकार अमरावतीच्या चिखलदरा येथे पाहायला मिळाला. जिथे काही तरुणांनी सेल्फीसाठी जीवघेणी स्टंटबाजी केली.  

या घटनेचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे. यामध्ये दिसत आहे की, शेकडो फूट दरीच्या काठावर दगडावर बसून हुल्लडबाज तरुणांचे फोटोसेशन सुरु आहे. येथून पाय घसरला शेकडो फूट दरीत कोसळण्याचा धोका आहे. 

हरिकेन पाईंटवर प्रवेश नसताना देखील काही पर्यटकांची तिथे स्टंटबाजी सुरु होती. तरुण हुल्लडबाजी करून स्वतः चा जीव धोक्यात टाकून खोल दरीच्या अगदी जवळ जाऊन फोटो काढत होते.

दगडावर उभे राहून फोटोसेशन करणाऱ्या तरुणांच्या चेहऱ्यावर भीती देखील दिसत नव्हती. फोटो काढताना हसून पोझ देताना हे तरुण दिसत होते. हरिकेन पॉईंटवर पर्यटकांना जाण्यास बंदी असताना देखील पर्यटक तिथे जात आहेत. याकडे प्रशासना लक्ष देण्याची गरज आहे. अन्यथा मोठी दुर्घटना होण्याचा धोका आहे. 

Advertisement

सेल्फी काढताना रील स्टारचा मृत्यू

रायगड जिल्ह्यातल्या माणगाव तालुक्यातील कुंभे धबधबा हा प्रसिद्ध आहे. इथे तर मुंबई पुण्यातून मोठ्या संख्येने पर्यटक येतात. 16 जुलैला रील स्टार म्हणून ओळख असलेली अवनी कामदार ही आपल्या मित्र मैत्रिणींसह आली होती. सात जणांचा हा ग्रुप धबधब्यावर आला होता. त्यावेळी अवनी ही फोटो काढण्यासाठी पुढे सरसावली त्यावेळी तिचा पाय घसरला आणि ती जवळपास 300 ते 350 फुट खोल दरीत कोसळली.