
Effects of dengue on the brain : पावसाळा येताच अनेक संसर्गजन्य, विषाणूजन्य आजार डोकं वर काढतात. साचलेल्या पाण्यातून निर्माण होणाऱ्या डेंग्यूचा विषाणू एडिस इजिप्ती डासांच्या मादी चावल्याने पसरतो. त्यामुळे पावसाळ्यात याबाबत अधिक काळजी घेण्याची आवश्यकता आहे. मात्र डेंग्यूचा परिणाम केवळ तुमच्या प्लेटलेट्सवर होतो असं नाही तर डेंग्यूचा (dengue treatment) परिणाम मेंदूवरही होतो.
16 ऑगस्ट रोजी मराठी ड्राइव्ह येथील एका 46 वर्षांच्या व्यक्तीला ताप आला होता. तो साधारण व्हायरल फ्लू असावा असं त्याने गृहीत धरलं. मात्र 36 तासांनी त्याचा त्रास वाढला आणि तो बेशुद्ध पडला. यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी त्याला ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल केले. येथे बराच वेळ त्याला झटके येत असल्याचं सांगितलं जात आहे. याबाबत त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉ. प्रीत समदानी म्हणाल्या, डेंग्यूमुळे (dengue symptoms) येणाऱ्या तापाचा थेट त्याच्या मज्जासंस्थेवर परिणाम झाला.
2023 आणि 2024 मध्ये महाराष्ट्रात डेंग्यूचे 20 हजार रुण नोंदवले गेले होते. मुंबईत डेंग्यू रुग्णांची संख्या वाढत असल्याचं दिसून येत आहे. जुलै महिन्यात 708, 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्टदरम्यान 404 रुग्णांची नोंद करण्यात आली होती. यातील काही रुग्णांच्या मेंदूवर परिणाम झाल्याचं आढळून आलं होतं. Infection disease specialist डॉ. वसंत नागवेकर म्हणाले, डेंग्यू आणि चिकनगुनिया दोन्ही विषाणू क्वचित प्रसंगी गंभीर रुप धारण करू शकतात. त्यांनी सांगितलं की, गेल्या महिन्यात एका रुग्णाला डेंग्यूसाठी दाखल करण्यात आले होते, मात्र काही आठवड्यांनी त्याला चिकनगुनियासाठी दाखल करण्यात आलं होतं.
नक्की वाचा - Health News: घरीच बीपी चेक करता का? डॉक्टरांनी सांगितली Blood Pressure तपासण्याची योग्य पद्धत
डेंग्यूचा मेंदूवर परिणाम
डेंग्यू विषाणू संक्रमित व्यक्तीच्या मेंदू आणि मज्जासंस्थेवर अनेक प्रकारे परिणाम करू शकतो. मेंदूला सूज येणे, एन्सेफलायटीस (मेंदूला सूज येणे) हा त्याच्या सर्वात गंभीर परिणामांपैकी एक आहे. रुग्णांना तीव्र डोकेदुखी, उच्च ताप, झटके येणे, मानसिक स्थितीत बदल आणि अगदी कोमा यासारखी लक्षणे जाणवू शकतात. याशिवाय, डेंग्यूमुळे मेंदुज्वर देखील होऊ शकतो, जो मेंदू आणि पाठीच्या कण्याभोवती असलेल्या पडद्यांला सूज येऊ शकते. ज्यामुळे मान कडक होणे, फोटोफोबिया आणि तीव्र डोकेदुखी होते.
डेंग्यूचा मज्जासंस्थेवर परिणाम
डेंग्यूमुळे होणाऱ्या इतर न्यूरोलॉजिकल समस्यांमध्ये अॅक्यूट डिसेमिनेटेड एन्सेफॅलोमायलिटिस (ADEM) यांचा समावेश आहे. मेंदू आणि पाठीच्या कण्यापर्यंत सूज येते. यामुळे गुइलेन-बॅरे सिंड्रोम (GBS) देखील होऊ शकतो. ही अशी स्थिती आहे, जिथे रोगप्रतिकारक शक्ती नसांवर हल्ला करते. ज्यामुळे स्नायू कमकुवत होतात आणि पक्षाघात होतो.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world