'काँग्रेस, उबाठा, शरद पवारांचे पोपट', देवेंद्र फडणवीसांची फटकेबाजी

पुढचे पाच वर्ष शेतकऱ्यांकडून विजेचे बील घेतले जाणार नाही, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. नागपुरमधील महायुतीचे उमेदवार सुधीर पारवे यांच्यासाठी आयोजित केलेल्या प्रचारसभेत ते बोलत होते. 

जाहिरात
Read Time: 2 mins

नागपुर:  महायुतीचे सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे राहणारे  सरकार आहे. आता चिंता करु नका. पुन्हा तुम्ही सरकार आणले तर 12,000 नाही 15,000  शेतकऱ्यांच्या खात्यात टाकू. शेतकऱ्यांना कृषी पंपाचे बीलही आपण माफ केले आहे. पुढचे पाच वर्ष शेतकऱ्यांकडून विजेचे बील घेतले जाणार नाही, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. नागपुरमधील महायुतीचे उमेदवार सुधीर पारवे यांच्यासाठी आयोजित केलेल्या प्रचारसभेत ते बोलत होते. 

काय  म्हणाले देवेंद्र फडणवीस?

'खरं म्हणजे गडकरी साहेबांच्या नेतृत्वात या जिल्ह्यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारने जे काम केले आहे त तुम्ही पाहताय.महायुतीचे सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे राहणारे  सरकार आहे. आता चिंता करु नका.पुन्हा तुम्ही सरकार आणले तर 12,000 नाही 15,000 शेतकऱ्यांच्या खात्यात टाकू. शेतकऱ्यांना कृषी पंपाचे बीलही आपण माफ केले आहे. पुढचे पाच वर्ष शेतकऱ्यांकडून विजेचे बील घेतले जाणार नाही.  आमचा शेतकरी आम्हाला विनंती करतो की दिवसा आम्हाला विज द्या. साप- विंचु असतात, आमचे जीवन खराब होते. यानंतर देशात पहिल्यांदा 14,000 मेगा व्हॅटच्या सौर ऊर्जेची निर्मिती केली,' असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

नक्की वाचा: 'मोदी- शहांच्याही बॅगा तपासा, नाहीतर..', जाहीर सभेतून ठाकरेंचा इशारा

लाडकी बहिणीवरुन मविआला टोला

'एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात महिलांसाठी अनेक योजना आणल्या. यापैकी महत्वाची योजना म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1500 रुपये महिना देण्याचा निर्णय आम्ही घेतला. या निर्णयानंतर काँग्रेसचे, उबाठाचे, शरद पवारांचे पोपट चिवचिव करत होते. हा निर्णय चुकीचा आहे. होणारच नाही, जमणारच नाही, हा तर जुमला आहे असं म्हणत होते. पण या नालायकांच्या नाकावर टिच्चून अडीच कोटी बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर पर्यंतचे पैसे आपण भरुन टाकले, यांचे थोबडे एवढे-एवढे झाले. पण लाडक्या बहिणींनो, या काँग्रेसच्या सावत्र भावांपासून सावध राहा,' असा टोलाही देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. 

महत्वाची बातमी:  'काँग्रेसमध्ये 14 वर्ष मी भोगलं', पक्ष सोडल्यानंतर अशोक चव्हाणांनी पहिल्यांदाच अनुभव सांगितला