जाहिरात

'काँग्रेसमध्ये 14 वर्ष मी भोगलं', पक्ष सोडल्यानंतर अशोक चव्हाणांनी पहिल्यांदाच अनुभव सांगितला

अशोक चव्हाण यांनी काँग्रेसमधील अंतर्गत राजकारणाबद्दल खळबळजनक खुलासे करतानाच पक्ष सोडण्याचे कारण पहिल्यांदाच स्पष्ट केले आहे. नेमकं काय म्हणाले अशोक चव्हाण? वाचा सविस्तर.

'काँग्रेसमध्ये 14 वर्ष मी भोगलं', पक्ष सोडल्यानंतर अशोक चव्हाणांनी पहिल्यांदाच अनुभव सांगितला

राहुल कुलकर्णी, नांदेड:  'कोणत्याच निवडणुकीची लढाई सोपी नसते. निवडणूक अशीच असते, शेवटपर्यंत लढायचे असते, गोळी कुठून येईल सांगता येत नाही. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे, वातावरण चांगले आहे. नांदेडमधील जागा भाजप जिंकेल,' असा विश्वास भारतीय जनता पक्षाचे नेते, राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला. एनडीटीव्ही मराठीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. यावेळी बोलताना अशोक चव्हाण यांनी काँग्रेसमधील अंतर्गत राजकारणाबद्दल खळबळजनक खुलासे करतानाच पक्ष सोडण्याचे कारण पहिल्यांदाच स्पष्ट केले आहे. नेमकं काय म्हणाले अशोक चव्हाण? वाचा सविस्तर.

काय म्हणाले अशोक चव्हाण? 

'कोणत्याच निवडणुकीची लढाई सोपी नसते. निवडणूक अशीच असते, शेवटपर्यंत लढायचे असते, गोळी कुठून येईल सांगता येत नाही.कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे, वातावरण चांगले आहे. मी केलेले काम बोलते, लोक म्हणतात आम्ही भाजपला मदत करत नाही, तुम्हाला मतदान करतोय. असंही लोक म्हणतात. मी काँग्रेसमध्येही असताना माझा व्यक्तिगत अजेंडा नव्हता. भाजपमधल्याही नवीन पद्धती मी आत्मसात करतोय. माझा व्यक्तीगत अजेंडा नाही. नांदेड का काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. मी इथे काँग्रेस रुजवली. आता भाजपमध्ये आल्यानंतर ही माझी पहिलीच निवडणूक आहे, त्यामुळे सर्व नेत्यांना सोबत घेऊन निवडणूकीला सामोरे जाण्याचा प्रयत्न मी करतोय,' असं अशोक चव्हाण यावेळी म्हणाले.

नक्की वाचा:  मी संधीसाधू तर शरद पवार कोण? अशोक चव्हाणांचा पलटवार

काँग्रेस का सोडली? 

'माझ्या मागे ईडी सीबीआय काही नाही. जे घडलं ते काँग्रेसच्या काळात घडलं. कुठल्याही छाप्याशी काही संबंध नाही. १४ वर्ष मी काँग्रेसमध्ये सहन केलं. त्यातले बरेचसे लोक स्वर्गवासी झालेत. काँग्रेसमध्ये माझी प्रगती कदाचित काही जणांना पटत नव्हती, असं मला वाटतं. मी मुक्तपणे काम करणारा माणूस आहे. राज्यात विविध स्वरावर माझी प्रगती झाली. ती काही लोकांना पटत नव्हती. त्याकाळात रचलेले षडयंत्र रचले गेले, जे मी १४ वर्ष भोगले. असे म्हणत अशोक चव्हाण यांनी काँग्रेसमधील अंतर्गत राजकारणावर भाष्य करतानाच पक्ष सोडण्याचे कारण पहिल्यांदाच स्पष्ट केले. तसेच आदर्श प्रकरणात अद्यापही काही सिद्ध झालेलं नाही, कोणीही करु  शकत नाही. ओढून ताणून ते प्रकरण लावण्याचा प्रयत्न झाला.सगळ्यात घाणेरड राजकारण म्हणजे पक्षांतर्गत राजकारण. आम्ही सर्व त्या राज कारणाचे शिकार आहोत,' अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली. 

शरद पवारांना टोला...

शंकरराव चव्हाण आणि शरद पवार यांच्यामधील मधुर संबंध सर्वांना माहित होते. दु्र्दैवाने शरद पवार आता माझ्याबद्दल बोलत आहेत, तो त्या संबंधांचा पुढील भाग असावा असे मला वाटते. शरद पवारांनी माझ्यासारख्या लहान माणसांवर बोलावं. त्यांनी माझी तुलना करावी किंवा दखल घ्यावी असा माणूसच मी नाही. शरद पवार मोठे नेते आहेत. बिल क्लिंटनपासून ते सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत त्यांचे संबंध आहेत. दांडगाईने राजकारण करण्याची काही नेत्यांची प्रवृत्ती आहे. शंकरराव चव्हाणांनी ते अनुभवले. शंकरराव चव्हाणांनाही पक्ष मिटींगमध्ये धक्काबुकी करण्यात आली होती. ही राजकारणाची संस्कृती आहे का? असे म्हणत अशोक चव्हाण यांनी शरद पवारांनावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. 

महत्वाची बातमी: तिकीट वाटपादरम्यान मातोश्रीवर काय घडले ? ठाकरेंच्या शिवसेनेसाठी प्राणाची बाजी लावणाऱ्या उपनेत्याचा राजीनामा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com