Solapur News : सोलापूरच्या नेत्यांना 'डोक्यात किडा गेलाय!' म्हणत मुख्यमंत्र्यांचा संताप, शहरासाठी मोठी घोषणा

Solapur News : सोलापूरच्या विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (बुधवार, 15 ऑक्टोबर) मोठी घोषणा केली. त्याचवेळी त्यांनी विरोधकांना सुनावलं.

जाहिरात
Read Time: 2 mins
Solapur News : मुख्यमंत्र्यांनी सोलापूरकरांना मोठं गिफ्ट दिलं आहे.
सोलापूर:

Solapur News :  सोलापूरच्या विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (बुधवार, 15 ऑक्टोबर) मोठी घोषणा केली. मुंबई-सोलापूर विमानसेवेचा (Mumbai-Solapur Flight Service) शुभारंभ केल्यानंतर झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी त्यांनी सोलापूरमध्ये लवकरच आंतरराष्ट्रीय दर्जाचे आयटी पार्क (IT Park) उभे करण्याची घोषणा केली, ज्यामुळे पुणे आणि मुंबईतील सोलापूरच्या तरुणांना शहरातच नोकरीची संधी मिळणार आहे. तसेच, भविष्यात सोलापूर विमानतळावर मोठे बोईंग (Boeing) विमान उतरेल आणि नाईट लँडिंगची (Night Landing) सुविधा सुरू केली जाईल, यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्याचबरोबर तिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या दुःखात राजकारण करणाऱ्यांवर त्यांनी सडकून टीका केली.

बोईंग विमान आणि नाईट लँडिंगचे नियोजन

सोलापूरच्या विमानतळाच्या विस्ताराबद्दल बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, 'पुढच्या काळात आपल्या सहकार्याने मोठे बोईंगचे विमान उतरले पाहिजे, यासाठी काही गोष्टी हातात घेणार आहोत. नाईट लँडिंगही झाले पाहिजे हे देखील पाहणार आहोत.' यामुळे सोलापूरच्या कनेक्टिव्हिटीला आणखी मोठी चालना मिळेल.

( नक्की वाचा : Akola News: अकोल्यात सत्ता कायम ठेवण्यासाठी वंचितला 'प्लॅन बी' ची गरज! दिग्गज नेत्यांना शोधावा लागेल नवीन गट )
 

संकटात राजकारण करणाऱ्यांना 'गेट वेल सून'

यावेळी मुख्यमंत्र्यांनी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या दुःखात राजकारण करणाऱ्यांवर सडकून टीका केली. 'मला कधीकधी आश्चर्य वाटतं की, आपत्ती असतानादेखील काही लोक राजकारण करतात. काही लोकांच्या डोक्यात इतका किडा गेला आहे की सोलापूरमधील एका नेत्याने म्हटले की, सोलापूरमध्ये झालेली अतिवृष्टी ही निसर्गामुळे झाली नाही, तर ती राज्य सरकारमुळे झाली. 

हा महापूर राज्य सरकारने आणला,' असे विधान ऐकून हसावे की रडावे हे कळेनासे झाले, असे ते म्हणाले. अशा नेत्यांना 'एक फूल द्या आणि गेट वेल सून सांगा,' असे म्हणत त्यांनी टोला लगावला. कितीही आपत्ती आली तरी हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.

Advertisement

( नक्की वाचा : Sachin Tendulkar: 10 रुपयांचा शेअर थेट 9 हजारांवर! 'क्रिकेटचा देव'च ठरला शेअरमागचा 'खेळाडू'? कंपनीनं मौन सोडलं )
 

शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार, या प्रश्नावरही मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाष्य केले. 'महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठे पॅकेज, म्हणजेच 32 हजार कोटी रुपये आपण यावर्षी शेतकऱ्यांना दिले आहेत,' अशी माहिती त्यांनी दिली. शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जाणे सुरू झाले असून, दिवाळीपूर्वी जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जातील. 'काहींना थोडे उशिराही मिळतील. आमचा प्रयत्न आहे की या महिन्यात ते शेतकऱ्यांच्या खात्यात गेले पाहिजेत,' असे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या नुकसानीची भरपाई पूर्णपणे करता येत नाही, मात्र सरकार त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे, असेही ते म्हणाले.


 

Topics mentioned in this article