जाहिरात

Karuna Munde: करुणा मुंडे आपल्याच वकीलावर भडकल्या, कोर्टाच्या बाहेर काय घडलं?

शिवाय करुणा मुंडे यांचे स्वतःचे व्यवसाय आहेत. त्यांना माझ्या पैशांची गरज नाही. ती स्वतः स्वतःचा खर्च मॅनेज करत आहे. असा दावाही यावेळी धनंजय मुंडे यांच्या वकीलाने कोर्टात केला.

Karuna Munde: करुणा मुंडे आपल्याच वकीलावर भडकल्या, कोर्टाच्या बाहेर काय घडलं?
मुंबई:

करुणा मुंडे यांच्या पोटगी प्रकरणाची सुनावणी कोर्टात सुरू आहे. यावेळी करुणा मुंडे या आपल्याच वकीलावर भडकल्याचे दिसून आले. करुणा मुंडे यांचे धनंजय मुंडे यांच्या बरोबर लग्न झाले आहे याचे काय पुरावे आहेत अशी विचारणा कोर्टाने करुणा मुंडेंच्या वकीलाला केली. मात्र त्यावर आमच्याकडे पुरावे आहेत, पण ते सादर करण्यासाठी वेळ द्यावा अशी मागणी करुणा मुंडे यांच्या वकीलाने कोर्टात सांगितलं. यावरुन करूणा मुंडे या चांगल्याच संतापल्या. त्यांनी कोर्टरूम बाहेर येताच आपल्याच वकीलाला सर्वां समोर चांगलेच झापले. याची चर्चा संपूर्ण कोर्ट परिसरात होती. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

करुणा मुंडे यांना पोटगी वाढवून हवी आहे. त्यांना खालच्या कोर्टाने दोन लाखाची पोटगी दिली आहे. पण आपल्याला बारा लाख पोटगी मिळाली अशी त्यांची मागणी आहे. त्यासाठी त्यांनी वरच्या कोर्टात याचिका दाखल केली आहे. त्यावर आज सुनावणी झाली. धनंजय मुंडे यांच्यासोबत करुणा मुंडे यांचे लग्न 1998 ला झाल्याचे करुणा मुंडे यांच्या वकीलाने कोर्टात सांगितले. या लग्नानंतर त्यांना अपत्य झाली. त्यांचे एकत्र फोटो आहेत. असं करुणा मुंडे यांच्या वकिलाकडून युक्तीवाद करण्यात आला. त्यामुळे त्यांचा पोटगीचा दावा योग्य आहे असंही त्यांनी सांगितलं. 

ट्रेंडिंग बातमी - Naxalite Encounter : छत्तीसगडमध्ये 16 नक्षलवाद्यांचा खात्मा, कोल्हापूरच्या अधिकाऱ्याची मोठी कामगिरी

यावर कोर्टाने करुणा मुंडे यांचे धनंजय मुंडे यांच्यासोबत लग्न झाले, याचे तुमच्याकडे काय पुरावे आहेत? अशी विचारणा केली.  लग्नाबाबतचे सगळे पुरावे आम्ही सादर करू, आम्हाला वेळ हवा आहे, असं त्यांच्या वकीलाने कोर्टात सांगितले. त्यावर पुढच्या तारखेला पुरावे सादर करा असे कोर्टाने आदेश दिले. त्यानंतर कोर्ट रूम बाहेर येताच करूणा मुंडे यांचा संताप झाला. तुम्ही लग्नाचे पुरावे का घेवून आला नाहीत, अशी विचारणा त्यांनी आपल्याच वकीलांना केली.  आपला राग काढताना आता पुढच्या तारखेला तरी ते आणा असं त्यांनी वकीलाला सुनावलं. 

ट्रेंडिंग बातमी - Wardha News : वर्ध्यातील 'या' गावात ग्रामस्थांचं वीज बिल शून्यावर, कशी साधली ही किमया?

दरम्यान धनंजय मुंडे यांच्या वकीलांनी करुणा मुंडे यांच्या मुलांचा धनंजय मुंडे स्विकार करतात. पण त्यांच्या आई बरोबर म्हणजे करुणा मुंडे यांच्या बरोबर लग्न झालेलं नाही असं कोर्टात स्पष्ट केलं. यावर कोर्टानेही धनंजय मुंडे यांच्या वकीलाला प्रतिप्रश्न केला. मुलं तुमची आहेत असं म्हणता मग  करुणा आई कशी नाही? असा सवाल केला. त्यावर राजश्री मुंडे याच धनंजय मुंडे यांच्या खऱ्या पत्नी आहेत असं सांगितलं गेले. शिवाय राजश्री मुंडे यांच्या बरोबर  लग्न करणार होतो, हे करूणाला माहित होते असा दावाही धनंजय मुंडेंनी आपल्या वकीला मार्फत कोर्टात केला. 

ट्रेंडिंग बातमी - 100 years of RSS : संघाचा राजकारणाशी संबंध आहे का? संघ अभ्यासकांचं काय आहे मत?

शिवाय करुणा मुंडे यांचे स्वतःचे व्यवसाय आहेत. त्यांना माझ्या पैशांची गरज नाही. ती स्वतः स्वतःचा खर्च मॅनेज करत आहे. असा दावाही यावेळी धनंजय मुंडे यांच्या वकीलाने कोर्टात केला. शिवाय सातत्याने करुणा मुंडे धनंजय मुंडेंवर आरोप करत आहेत. करुणा मुंडेंनी व्यवसायात 3 कोटींची गुंतवणूक केली, त्यामुळे त्यांना पोटगी कशाला? हवी असा युक्तीवाद धनंजय मुंडे यांच्या वकीलाने कोर्टात केला आहे. त्यामुळे या प्रकरणात कोर्ट काय निर्णय घेणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र  दोन्ही वकीलांनी आज कोर्टात जोरदार युक्तीवाद केला.