सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सर्व पुराव्यांसह काल 27 जानेवारी रोजी अजित पवारांची भेट घेतली. यावेळी दमानियांकडून मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान आज मंत्रिमंडळ बैठकीत यावर निर्णय घेतला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सर्वोच्च न्यायालयात महापालिका निवडणुकीच्या संदर्भात दाखल याचिकांच्या सुनावणीवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार हे अवलंबून आहे. दरम्यान आज सुप्रीम कोर्टात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीबाबत सुनावणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्ट आज काय होईल याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
तिसऱ्या T20 सामन्यात इंग्लंडने टीम इंडियाचा केला पराभव
तिसऱ्या T20 सामन्यात इंग्लंडने टीम इंडियाचा पराभव केला आहे. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 171 धावा केल्या. इंग्लंडचे 9 फलंदाज बाद झाले. भारताकडून वरूण चक्रवतीने सर्वाधिक 5 फलंदाज बाद केले. इंग्लंडकडून बेन डकेत याने सर्वाधिक 51 धावा केल्या. भारताला विजयासाठी 172 धावांचे लक्ष देण्यात आले होते. मात्र या लक्षाचा पाठलाग करताना भारताची सुरूवात खराब झाली. संजू सॅमसन 3 धावा करून बाद झाला. अभिषेक शर्माने काही चांगले फटके खेळले पण तो ही 24 धावांवर बाद झाला. भारताकडून सर्वाधीक 40 धावा हार्दीक पंड्याने केल्या. भारताला 20 षटकात 145 धावा करता आल्या. भारताचा इंग्लंडने 26 धावांनी पराभव केला. पाच सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने भारत पुढे आहे. मालिकेतील आणखी दोन सामने शिल्लक आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 30 जानेवारीला राज्यस्तरीय मेळावा
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 30 जानेवारीला राज्यस्तरीय मेळावा होणार आहे. या मेळाव्याला राज ठाकरे संबोधित करणार आहेत. याबाबत मनसेने आपल्या फेसबूक पेजवरून माहिती दिली आहे.
IND vs ENG 3T20 : कशी आहे टीम इंडियाची Playing 11?
राजकोटमधील तिसऱ्या टी20 सामन्यात टीम इंडियात एक बदल करण्यात आला आहे. अर्शदीप सिंगच्या जागी मोहम्मद शमीचा टीममध्ये समावेश करण्यात आला आहे.
टीम इंडियाची Playing 11 : संजू सॅमसन (विकेटकिपर), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कॅप्टन), हार्दिक पांड्या, ध्रुव जुरेल, अक्षर पटेल (व्हाईस कॅप्टन), वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती
IND vs ENG 3T20 : सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसरा टी20 सामना राजकोटमध्ये सुरु झाला आहे. या सामन्यात टीम इंडियाचा कॅप्टन सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला असून पहिल्यांदा फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात फास्ट बॉलर मोहम्मद शमीनं तब्बल 15 महिन्यानंतर टीममध्ये पुनरागमन केलं आहे.
दिनेश वाघमारे यांनी स्वीकारला राज्य निवडणूक आयुक्तपदाचा पदभार
राज्याचे माजी अपर मुख्य सचिव दिनेश वाघमारे यांनी आज राज्य निवडणूक आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला. राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी त्यांचे स्वागत केले. राज्यपालांनी वाघमारे यांची पाच वर्षांसाठी राज्य निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती केली आहे. त्यासंदर्भातील अधिसूचना 20 जानेवारी 2025 रोजी प्रसिद्ध झाली होती. त्यानुसार त्यांनी आज राज्याचे सातवे राज्य निवडणूक आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला.
पुण्याचे माजी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची चौकशी होणार
पुण्याचे माजी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची चौकशी होणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार एसीबी कडून आयपीएस अमिताभ गुप्ता यांच्या मालमत्तेची चौकशी होणार आहे. सध्या गुप्ता हे Indo Tibet Border Police चे पोलिस महानिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. पुणे पोलिस आयुक्तपदानंतर त्यांनी अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधार सेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे हे पदभार स्वीकारले होते.
सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीविरोधात भक्कम पुरावे
सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणातील आरोपीच्या विरोधात भक्कम पुरावे मिळाले आहेत. त्याच्या विरोधात आमच्याकडं फिजिकल, टेक्निकल आणि ओरल तीन्ही प्रकारचे पुरावे आहेत. त्या पुराव्याच्या आधारे आमचा तपास सुरु आहेत, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.
Live Update : पालिका निवडणुका आणखी लांबणीवर? सुनावणी पुढे ढकलली
महापालिका निवडणूका आणखी लांबणार असल्याची शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.
Live Update : 30 रुपये किलोने मिळणारे भेंडी सध्या ६० रुपयांवर
थंडीच्या हंगामात भेंडीच्या भाजीला मोठी मागणी असते मात्र नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारात सध्या भेंडी महाग झाली आहे. 30 रुपये किलोने मिळणारे भेंडी सध्या ६० रुपयांनी विकले जात आहेत.. दरम्यान सध्या थंडीच्या हंगाम सुरु असल्याने भेंडीची आवक बाजारात कमी येत आहे.. आवक कमी आल्याने दर वाढले असल्याचं व्यापाऱ्यांनी म्हटलं आहे.. त्याचसोबत इतर भाज्यांपेक्षा सध्या भेंडीचे दर हे वाढले आहेत.. तर पुढील १५ दिवसांमध्ये दर कमी होण्याचा शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे..
Live Update : वाल्मीक कराड यांच्या दुसऱ्या पत्नीच्या नावाने लातूरमध्ये कोट्यवधीची प्रॉपर्टी
दोन कोटी खंडणी प्रकरणातील आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी असलेल्या वाल्मीक कराड यांच्या दुसऱ्या पत्नीच्या नावाने लातूरमध्ये कोट्यावधी रुपयाची प्रॉपर्टी असल्याचे उघड झाला आहे.. वाल्मीक कराड यांची दुसरी पत्नी ज्योती मंगल जाधव यांच्या नावाने पुणे सोलापूर या ठिकाणी प्रॉपर्टी आढळून आली आहे. नंतर आता लातूरमध्ये सुद्धा आलिशान बंगला असल्याचे उघड झाला आहे..सुरेश धस यांच्या आरोपानंतर लातूरमध्ये सुद्धा प्रॉपर्टी आढळून आली आहे... लातूर शहर महानगरपालिका हद्दीतील न्यू सरस्वती कॉलनी भागात आलिशान बंगला असल्याचे समोर आले आहे.
Live Update : एस.टी.भाडेवाढ विरोधात शिवसेना ठाकरे गट आक्रमक, मनमाड बस स्थानकात लालपरी रोखल्या
महायुती सरकारने केलेल्या एस.टी. भाडेवाढीच्या विरोधात नाशिकच्या मनमाडमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गट आक्रमक झाला असून, संतप्त शिवसैनिकांनी मनमाड बस स्थानकात लालपरी रोकत चक्का जाम आंदोलन आंदोलन केली. यावेळी जोरदार घोषणाबाजी करीत एस.टी.ची. भाडेवाढ तातडीने रद्द करण्याची मागणी केली.
Live Update : पुण्यातील येरवडा परिसरात कोयत्याने गाड्यांची तोडफोड
पुण्यातील येरवडा परिसरात असणाऱ्या कामराजनगर मध्ये कोयत्याने गाड्यांची तोडफोड.
श्रीकांत चव्हाण नावाच्या तरुणाला कोयत्याने व्यक्तीला जबर मारहाण
घटना सीसीटीव्हीत कैद
लाकडी बांबू आणि धारदार शस्त्राने केली गाड्यांची तोडफोड.
दहशत माजवण्याच्या हेतूने तोडफोड मारहाण केल्याची माहिती.
आरोपी विरुद्ध येरवडा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल असून येरवडा पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
Live Update : छत्रपती संभाजीनगर-मालेगाव महामार्गावर भीषण अपघात, चार कामगारांचा जागीच मृत्यू
छत्रपती संभाजीनगर-मालेगाव महामार्गावर शिंदीनाला फाट्याजवळ भीषण अपघात
कंटेनरमधून प्रवास करणाऱ्या कामगारांच्या अंगावर लोखंडी प्लेट पडल्याने चौघांचा जागीच मृत्यू
चारही कामगारांचे मृतदेह वैजापूरच्या शिऊर शासकीय रुग्णालयात
मयत चारही कामगार परप्रांतीय
Live Update : स्थानिक स्वराज्य संस्था संदर्भात सुनावणी दुपारनंतर सुप्रीम कोर्टात येण्याची शक्यता
Live Update : स्थानिक स्वराज्य संस्था संदर्भात सुनावणी दुपारनंतर सुप्रीम कोर्टात येण्याची शक्यता
Live Update : ड्रोनचा वापर करून शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी यांचा शोध सुरू
शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी यांचे अपहरण प्रकरण
ड्रोनचा वापर करून अशोक धोडी यांचा शोध सुरू
पालघर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आणि घोलवड पोलिसांच्या पथकाकडून शोध सुरू
20 जानेवारीपासून अशोक धोडी त्यांच्या कारसह बेपत्ता
अशोक धोडी यांचे अपहरण झाल्याचा कुटुंबीयांचा आरोप
लवकरच अशोक धोडी यांचा तपास लागणार असल्याची पोलिसांची माहिती
Live Update : परळीतील महादेव मुंडे खून प्रकरणाच्या तपासाला वेग
परळीतील महादेव मुंडे खून प्रकरणाच्या तपासाला वेग आल्याचे दिसून येत आहे. सोमवारी रात्री परळी शहर पोलिसांनी महादेव मुंडे खून प्रकरणाचे सर्व कागदपत्रे अंबाजोगाईचे पोलीस उपाधीक्षक अनिल चोरमले यांना सुपूर्द केले आहेत. या आधीच काल मुंडे कुटुंबीयांनी अनिल चोरमले यांची अंबाजोगाई येथील कार्यालयात जाऊन भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी या प्रकरणातील आरोपी शोधण्याचे आश्वासन देखील दिले होते. याआधी आष्टीचे आमदार सुरेश ठस यांनी महादेव मुंडे प्रकरणाचा तपास नव्याने व्हावा यासाठीची मागणी बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्याकडे केली होती. आता याच अनुषंगाने या प्रकरणाच्या तपासाला गती मिळाल्याचे दिसून येत आहे.
Live Update : ट्रॅक्टरखाली चिरडून महिलेची हत्या, जमिनीच्या वादातून करण्यात आली हत्या
जमिनीच्या वादातून एका महिलेची ट्रॅक्टर खाली चिरडून हत्या केल्याची धक्कादायक घटना नाशिकच्या कळवण तालुक्याच्या गोळाखाल येथे घडली. जिजाबाई पवार असे या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. या घटनेने परिसर हादरला आहे. दरम्यान घटनेनंतर तुंबळ हाणामारीही झाली. या घटनेतील आरोपीवर नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. ट्रॅक्टर अंगावर घालणाऱ्या संशयित हेमंत पवार व यांच्यासह इतरांविरुद्ध अभोणा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.