Dharashiv News: "शक्तीपीठ महामार्गासाठी जमीन मोफत देतो, पण...", शेतकऱ्याच्या एका अटीचा तुम्हालाही अभिमान वाटेल

Dharashiv News: शक्तीपीठ महामार्गाला राज्यभरातून विरोध होत असताना, धाराशिव जिल्ह्यातील चिखली गावच्या धनंजय (धनु) तांबे या तरुण शेतकऱ्याने महामार्गासाठी आपली एक एकर जमीन मोफत देण्याची तयारी दर्शवली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

ओंकार कुलकर्णी, धाराशिव

महाराष्ट्र शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या 'शक्तीपीठ महामार्गा'ला राज्यभरातील अनेक जिल्ह्यांतून शेतकरी आणि विविध संघटनांकडून तीव्र विरोध होत आहे. जमिनीच्या संपादनावरून शेतकरी आक्रमक झालेले असतानाच, धाराशिव जिल्ह्यातून मात्र एक अत्यंत वेगळी आणि अनोखी भूमिका समोर आली आहे. जिल्ह्यातील चिखली गावचे एक तरुण शेतकरी धनंजय तांबे यांनी महामार्गासाठी स्वतःची हक्काची एक एकर जमीन सरकारला 'मोफत' देण्याचा प्रस्ताव दिला आहे. मात्र, हा प्रस्ताव देताना त्यांनी एक ऐतिहासिक आणि भावनिक अट सरकारसमोर ठेवली आहे.

काय आहे शेतकऱ्याची अनोखी अट?

शेतकरी धनंजय तांबे यांची मागणी आहे की, त्यांच्या संपादित केल्या जाणाऱ्या जमिनीतून जो शक्तीपीठ राष्ट्रीय महामार्ग जाणार आहे, त्या महामार्गावर छत्रपती शिवाजी महाराजांचा एक भव्य आणि देखणा पुतळा उभारण्यात यावा. जर सरकारने ही मागणी मान्य केली, तर ते आपल्या जमिनीचा एक रुपयाही मोबदला घेणार नाहीत आणि 1 एकर जमीन सरकारला थेट दान करतील.

Advertisement

Dharashiv News

(नक्की वाचा-  Vaibhav Sooryavanshi News: "माझ्यासाठी फक्त दोनच संघांनी बोली का लावली?" : वैभव सूर्यवंशी)

आपली हीच मागणी थेट सरकार आणि प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी तांबे यांनी धाराशिव शहरात विविध प्रमुख चौकांमध्ये मोठे बॅनर्स लावले आहेत. या अनोख्या आणि गडद शिवप्रेमाची साक्ष देणाऱ्या बॅनरबाजीमुळे सध्या संपूर्ण राज्यभरात या तरुण शेतकऱ्याचे कौतुक आणि चर्चा सुरू आहे.

गावकरी भूमिकेवर ठाम; योग्य मोबदल्याची मागणी

एककीडे धनंजय तांबे यांनी भावनिक साद घालत जमीन मोफत देण्याची तयारी दर्शवली असली, तरी चिखली गावातील इतर ग्रामस्थांनी मात्र व्यावहारिक भूमिका घेतली आहे. गावातील इतर शेतकऱ्यांनी स्पष्ट केले आहे की, महामार्गासाठी ज्यांच्या जमिनी संपादित केल्या जाणार आहेत, त्यांना कायद्यानुसार योग्य आणि चालू बाजारभावानुसार आर्थिक मोबदला मिळालाच पाहिजे.

(नक्की वाचा-  Hero Flex Fuel Bike: पेट्रोलपेक्षा 20 रुपये फ्लेक्स-फ्यूल बाईक किती परवडेल? जाणून घ्या संपूर्ण बचतीचे गणित)

ग्रामस्थांच्या या भूमिकेमुळे गावात दोन वेगवेगळ्या चर्चा सुरू असल्या, तरी धनंजय तांबे यांच्या या एका अटीमुळे थंडावलेला शक्तीपीठ महामार्गाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आता सरकार या तरुण शेतकऱ्याच्या ऐतिहासिक मागणीची दखल घेणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
 

Topics mentioned in this article