जाहिरात

Hotel Bhagyashree News: खळबळजनक! 'हॉटेल भाग्यश्री'च्या मालकाचे अपहरण, बेदम मारलं अन् पुलावरुन फेकलं

Dharashiv Hotel Bhagyashree Owener Nagesh Madke Kidnapped: मडके हे  कारजवळगेले असता त्यांना  गाडीच्या खिडकीमध्ये अडकवून त्यांचे अपहरण करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. 

Hotel Bhagyashree News:  खळबळजनक! 'हॉटेल भाग्यश्री'च्या मालकाचे अपहरण, बेदम मारलं अन् पुलावरुन फेकलं

 Hotel Bhagyashree owner Kidnaped: सोशल मीडियावर चर्चेत असलेल्या हॉटेल भाग्यश्रीबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. धाराशिवमधील प्रसिद्ध हॉटेल भाग्यश्रीच्या मालकांचे अपहरण करण्यात आले आहे. बुधवारी सायंकाळच्या सुमारास पाच जणांनी त्यांचे अपहरण करुन बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या नागेश मडके यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Hotel Bhagyashree VIDEO: बायकोच्या 'बर्थडे'ला हत्ती घेतला! 'हॉटेल भाग्यश्री'ची तुफान चर्चा; नेमका विषय काय?

समोर आलेल्या माहितीनुसार, हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके यांचे बुधवारी अपहरण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बुधवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास हा सगळा प्रकार घडला. नागेश मडके हे त्यांच्या हॉटेलमोर उभे होते. त्यावेळी एक चारचाकी तिथे आली. त्या गाडीमधील लोकांनी सेल्फीच्या बहाण्याने नागेश मडके यांना बोलावून घेतले. मडके हे  कारजवळगेले असता त्यांना  गाडीच्या खिडकीमध्ये अडकवून त्यांचे अपहरण करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. 

या अपहरणकर्त्यांनी त्यांना पाच किलोमीटर पर्यंत फरफटत नेले. यावेळी गाडीत त्यांना बेदम मारहाणही करण्यात आली. ह्याला मारुन टाकू, मरेपर्यंत सोडायचे नाही. ह्याला मारुन टाकायचं अन् पुलात फेकून द्यायचं अशी धमकी ते देत होते. त्यांनी पुढे वडगावच्या पुलावर फेकून दिले, असा खळबळजनक दावा स्वतः भाग्यश्रीचे मालक नागेश मडकेंनी केला आहे.  दरम्यान, मला याआधाही धमकीचे फोन आले होते. त्यानंतर असा मारहाणीचा प्रकार घडला असल्याचे मडके यांनी सांगितले आहे. 

नॉनव्हेज प्रेमींच्या आवडीचे 'ढवारा मटण' म्हणजे काय? बनवण्याची पद्धतही खास; वाचा रेसिपी

Listen to the latest songs, only on JioSaavn.com