जाहिरात
Story ProgressBack

धाराशिवमध्ये निवडणूक प्रचारादरम्यान आमदार उष्माघाताने कोसळले

निंबाळकरांच्या प्रचारादरम्यान आमदार कैलास पाटील यांना चक्कर आली आणि ते खाली कोसळले. 

Read Time: 1 min
धाराशिवमध्ये निवडणूक प्रचारादरम्यान आमदार उष्माघाताने कोसळले
धाराशिव:

सध्या राज्यभरात प्रचाराचा झंझावात सुरू आहे. येत्या दोन दिवसात पहिल्या टप्प्याचं निवडणूक होणार आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. मात्र त्यातच गेल्या काही दिवसांपासून उन्हाळाचा पारा वाढत आहे. सोमवारी अनेक जिल्ह्यातील तापमानाचा पारा चाळीशी पार गेला होता. त्यातच खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या रॅलीदरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांना उष्माघाताचा फटका बसला. निंबाळकरांचा प्रचार करीत असताना रॅलीत असताना त्यांना चक्कर आली आणि ते खाली कोसळले. 

यानंतर कार्यकर्त्यांनी त्यांना सावरण्याचा प्रयत्न केला.शेजारी बसून कार्यकर्ते त्यांना वारा घालताना दिसत आहे. कार्यकर्त्यांनी गाडीतून त्यांना रुग्णालयात पोहोचवलं. पाटील यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून येथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

धाराशिवमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शहरातून शक्तिप्रदर्शन करण्यात आलं होतं. यावेळी शहरातून रॅली काढण्यात आली होती. भर उन्हात काढलेल्या या रॅलीदरम्यान ट्रकवरुन नेतेमंडळी अभिवादन करीत होते. ट्रकवरुन उतरून सभामंचाच्या दिशेने जात असताना त्यांना उष्माघाताचा त्रास झाला. यावेळी अचानक चक्कर येऊन ते जमिनीवर कोसळले. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
डार्क मोड/लाइट मोड बदलण्यासाठी
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination