Beed News : बडतर्फ पोलीस निरीक्षकाने संपवलं आयुष्य, आत्महत्येचं कारण अस्पष्ट

अंबाजोगाई शहरातील प्रशांतनगर येथे भाड्याच्या घरात राहणारे पोलीस निरीक्षक सुनील नागरगोजे यांनी सोमवारी रात्री आत्महत्या केली.

जाहिरात
Read Time: 2 mins

आकाश सावंत, बीड

Beed News : अंबाजोगाई शहरात एका बडतर्फ पोलीस निरीक्षकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुनील रामराव नागरगोजे असे या पोलीस निरीक्षकाचे नाव असून, त्यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आपले जीवन संपवले. त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र त्यांच्या बडतर्फीशी त्याचा संबंध असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

अंबाजोगाई शहरातील प्रशांतनगर येथे भाड्याच्या घरात राहणारे पोलीस निरीक्षक सुनील नागरगोजे यांनी सोमवारी रात्री आत्महत्या केली. घरात कोणीही नसताना त्यांनी छताच्या पंख्याला दोरी बांधून गळफास घेतला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी अंबाजोगाई येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवला आहे.

(नक्की वाचा- Dhule News: भर दिवसा 2 पोलिसांना मारहाण, कानाखाली मारतानाचा Video होतोय व्हायरल)

सुनील नागरगोजे हे मूळचे परळी तालुक्यातील नागदरा येथील रहिवासी होते. सेवेत असताना त्यांच्यावर अनेक गैरवर्तणुकीचे आरोप झाले होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सतत वाद, सहकाऱ्याला धमकी देणे, वारंवार कामावर गैरहजर राहणे आणि दीर्घकाळ 'सिक लीव्ह'वर जाणे ही त्यांची कार्यशैली बनली होती. याच तक्रारींवरून त्यांना अखेर सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते.

(नक्की वाचा- Malegaon News: मदत मागायला गेली अन् वासनेची शिकार झाली! MIM नेत्याचे भयंकर कृत्य, अखेर...)

आत्महत्येचे कारण अस्पष्ट

सेवेतून बडतर्फ झाल्यानंतर सुनील नागरगोजे नैराश्यात होते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, त्यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत आणि लवकरच या आत्महत्येमागचे कारण समोर येईल अशी अपेक्षा आहे.

Advertisement

Topics mentioned in this article