
Diwali Faral Abroad Delivery: घरोघरी सध्या दिवाळी सणाची लगबग सुरु झाली आहे. दिवाळीच्या (Diwali) निमित्ताने परदेशात (Abroad) राहणाऱ्या आपल्या नातेवाईकांना घरगुती फराळ पाठवण्याची सोय उपलब्ध व्हावी, यासाठी टपाल खात्याने (Postal Department) यंदा 'खास योजना' आणली आहे. या योजनेचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन रत्नागिरी येथील डाकघर अधीक्षक अनंत सरंगळे यांनी केले आहे. याचबरोबर टपाल खात्याने आपल्या दोन महत्त्वाच्या सेवांमध्ये मोठे बदल केले आहेत.
दिवाळी फराळासाठी विशेष योजना:
टपाल खात्याने आता रजिस्टर (Registered) आणि स्पीडपोस्ट (Speedpost) या दोन सेवांचे विलिनीकरण करण्याचा निर्णय घेतला असून, या दोन्ही सेवांसाठी नवे दरपत्रक लागू करण्यात आले आहे. या निर्णयामुळे ग्राहकांना सेवांचा लाभ घेणे अधिक सोपे होईल. टपाल खात्याने फराळ परदेशी पाठवण्यासाठी विशिष्ट दरपत्रक लागू केले आहे. ही सेवा इंग्लंड, कॅनडा, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, संयुक्त अरब अमिरात (UAE) यांसारख्या प्रमुख देशांसाठी उपलब्ध आहे.
Right way to eat Apple: सफरचंद सालीसकट खायचं की सोलून खायचं? काय आहे योग्य पद्धत?
किती असेल दर?
इंग्लंडला पार्सल (१ किलोपर्यंत):
हवाई मार्ग (Air Mail): Rs 2,177
स्पीडपोस्ट: Rs 2,636
अन्य देशांसाठीही वेगवेगळे दरपत्रक लागू करण्यात आले आहेत. या सेवेचा लाभ घेण्यासाठी टपाल खात्यात विशेष काऊंटरची व्यवस्था करण्यात आली आहे. या विशेष सुविधेअंतर्गत जास्तीत जास्त ३५ किलो वजनापर्यंतचा फराळ परदेशी पाठवला जाऊ शकेल. रत्नागिरी आणि चिपळूण येथील नागरिकांना या सेवेचा लाभ घेता यावा, यासाठी येथील टपाल कर्मचाऱ्यांवर विशेष कार्यभार सोपवण्यात आल्याची माहिती अधीक्षक अनंत सरंगळे यांनी दिली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world