ऋतिक गणकवार, मुंबई:
Dr Gauri Garje Palve Suicide Case: भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांच्या डॉक्टर पत्नीने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. डॉ. गौरी गर्जे- पालवे असं आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव असून त्यांनी वरळीतील राहत्या घरी गळफास घेत आयुष्य संपवले. मात्र ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा गंभीर आरोप गौरी पालवे यांनी यांच्या कुटुंबियांनी केला आहे. या प्रकरणात आता सर्वात मोठा खुलासा झाला आहे.
एका कागदपत्राने आयुष्यात वादळं आलं..
सप्टेंबर महिन्यात सापडलेल्या एका कागदपत्राने अनंत गर्जे आणि गौरी गर्जे यांच्या वैवाहिक जीवनात वादळ आले. जेव्हा अनंत गर्जे आणि गौरी गर्जे यांनी घर शिफ्ट केले त्यावेळी गौरीला एक कागद सापडला, ज्यामध्ये इंगळे या महिलेचे पती म्हणून अनंत गर्जे याचे नाव आहे. ही बाब गौरी हिने तिच्या वडिलांना सांगितली, मात्र तुझे आई वडील जर मला जाब विचारायला आले तर मी चिठ्ठी लिहून आत्महत्या करेन आणि त्या चिठ्ठीमध्ये तुझी नाव लिहिन अशी धमकी वारंवार गौरी हिला अनंत द्यायचा.
घटनेपूर्वी काय घडलं?
अनंत गर्जे यांनी आधी मुलीचे वडील अशोक पालवे यांना फोन करत सांगितले की, तुमची मुलगी आत्महत्या करतेय तिला समजावून सांगा, त्यावेळी मुलीच्या वडील म्हणाले की गौरीकडे फोन द्या तर अनंत म्हणाला तिला मी दवाखान्यात घेऊन जातोय. मात्र लगेचच गर्जे याने मुलीच्या आईला फोन करत कळवले की तिच्या मुलीने आत्महत्या केली आणि मृत झाली त्यानंतर घरचे मुंबईला निघाले, गौरीच्या आईने 50 हून अधिक फोन केले मात्र गर्जेने एकही कॉल उचलला नाही.
तसेच गौरी हिच्या अंगावर अनेक वेळा मारहाणीचे व्रण दिसत होते, आई वडिलांनी देखील पाहिले आहे आणि तिच्यासोबत डेंटिस्ट विभागात काम करत असलेल्या तिच्या सहकाऱ्यांनी देखील पहिले आहे, असा दावा करण्यात आला आहे. याप्रकरणी अनंत गर्जे, बहिण शीतल गर्जे, दीर अजय गर्जे यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world