Bhiwandi News : भिवंडीत 'दृश्यम'कांड, 4 वर्षांपूर्वी तरुणाला सलूनमध्ये गाडलं, मौलानाचं क्रूर कृत्य अखेर उघड

मौलानाने शोएबची हत्या केल्यानंतरही तो त्याच्या कुटुंबाच्या संपर्कात होता. दोन वर्षे तो त्याच परिसरात राहत होता. पण तरीही कोणालाच कुणकुण लागली नाही.

जाहिरात
Read Time: 2 mins

Bhiwandi News : भिवंडीतून एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अभिनेता अजय देवगण याच्या दृश्यम चित्रपटासारखा प्रकार भिवंडीत घडला आहे. भिवंडी शहरातील नवीबस्ती नेहरूनगर परिसरातील चार वर्षांपूर्वी एका दुकानात हत्या करून मृतदेह दुकानात पुरण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे. मृतदेहाचे काही अवशेष दुकानात गाडून ठेवणारा मौलवी असल्याची माहिती आहे. ठाणे गुन्हा शाखेच्या मालमत्ता कक्षाच्या पोलिसांनी मौलानाला अटक करीत घटनास्थळावरून गाडून ठेवलेले काही अवशेष पोलिसांनी जप्त केले आहेत. गुलाम रब्बानी असे अटक केलेल्या मौलवीचे नाव असून शोएब शेख वय 17 असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मिळालेल्या माहितीनुसार, नवीबस्ती नेहरूनगर परिसरातील शोएब शेख हा 17 वर्षीय तरुण 20 नोव्हेंबर 2020 रोजी बेपत्ता झाला होता. त्यानंतर पोलिसांकडून याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान स्थानिकांकडून मौलावीवर संशय व्यक्त करण्यात आला होता. त्यामुळे स्थानिकांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर 2023 मध्ये भिवंडी शहर पोलिसांनी मौलाना गुलाम रब्बानी याला चौकशीसाठी बोलावलं होतं. परंतु त्यावेळी पोलीस ठाण्यात झालेल्या गर्दीचा फायदा घेत मौलाना फरार झाला होता. तेव्हापासून पोलीस त्याच्या मागावर होते.

Advertisement

Advertisement

नक्की वाचा - ओढणीनं आवळला गळा, मृतदेह घेऊन बाईकवर फिरले, प्रियकरासोबत पकडलं म्हणून YouTuber नं घेतला नवऱ्याचा जीव

ठाणे गुन्हे शाखेच्या मालमत्ता शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरखनाथ घार्गे यांच्या टीमला आरोपी गुलाम रब्बानी याच्या बाबत माहिती मिळाली होती. त्यांनी काही दिवसांपूर्वी मौलानाला अटक केलं. त्याला पोलिसी खाक्या दाखताच मौलानाने हत्येची कबुली दिली. त्याला मृतदेहाबाबत विचारण्यात आलं. मौलानाने शोएबच्या मृतदेहाचा काही भाग रस्त्याशेजारील कचऱ्यात तर शिर आणि इतर अवयव सलून दुकानात गाडून ठेवण्यात आल्याचं सांगितलं.  स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपीस घटनास्थळी नेण्यात आले. तेथे शासकीय पंचांच्या समक्ष मृतदेहाचे काही अवशेष बाहेर काढून फॉरेन्सिक पथकाच्या मदतीने ताब्यात घेण्यात आले आहेत. 

Advertisement

आमचा मुलगा शोएब बेपत्ता झाल्यापासून दोन वर्ष आरोपी गुलाम रब्बानी हा आमच्याच परिसरात होता. तो आमच्या संपर्कात होता. पण त्याने कधीच काही कळू दिलं नाही. आपल्या निष्पाप मुलाची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपीस कठोरात कठोर फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी मयत शोएबच्या आईने केली आहे.