ऑन ड्युटी, फूल टाईट; दारुच्या नशेत डॉक्टर रुग्णालयात, गडचिरोलीच्या शासकीय रुग्णालयातील प्रकार

एटापल्लीसह परिसरातील नागरिकांनी संबंधित डॉक्टर योगेश मणकर यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे. चांगल्या डॉक्टरांची नियुक्ती तात्काळ करण्यात यावी अशी विनंती नागरिकांनी केली आहे.

Advertisement
Read Time: 2 mins

मनीष रक्षमवार, गडचिरोली

गडचिरोली जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयातील डॉक्टरची संतापजनक कृती समोर आली आहे. डॉक्टरांची रुग्णालयात गैरहजेरी आणि दारुच्या नशेत रुग्णालयात उपस्थित राहणे यामुळे रुग्णांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावं लागलं आहे. एटापल्ली शहरापासून 8-10 किलोमीटर अंतरावर असलेल्या एटापल्ली-गेदा या मुख्य रस्त्यावर एक व्यक्ती गंभीर अवस्थेत जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी एटापल्ली येथील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांची गैरहजेरी आणि डॉक्टर दारुच्या नशेत असल्याने रुग्णाच्या नातेवाईकांना संकटाचा सामना करावा लागला.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

रुग्णालयात डॉक्टर उपस्थित नसल्याने रुग्णाच्या नातेवाईकांनी एटापल्ली येथील सामाजिक कार्यकर्ते तेजस गुज्जलवार यांच्याशी संपर्क साधला. गुज्जलवार यांनी तातडीने रुग्णालयात धाव घेतली आणि पाहणी केली असता, डॉक्टर उपस्थित नव्हते. दूरध्वनीद्वारे डॉक्टर योगेश मणकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु प्रतिसाद मिळाला नाही. अखेर, गुज्जलवार यांनी डॉक्टरांच्या कॉलनीत जाऊन डॉक्टरला उपचारासाठी बोलावले. त्यावेळी डॉक्टर योगेश मणकर दारूच्या नशेत असल्याचे आढळून आले.

(नक्की वाचा-  ठाकरे गटाच्या निष्ठावंताची हत्या, पत्नीचं 'ठाकरे' कनेक्शन समोर आल्यानं खळबळ)

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारित झाल्यानंतर लोकांनी याबाबत संताप व्यक्त केला आहे. एटापल्लीसह परिसरातील नागरिकांनी संबंधित डॉक्टर योगेश मणकर यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे. चांगल्या डॉक्टरांची नियुक्ती तात्काळ करण्यात यावी अशी विनंती नागरिकांनी केली आहे.

(नक्की वाचा - सावधान! मुंबई पुढील 16 वर्षांत होणार गायब? मुंबईकरांची चिंता वाढवणारे संशोधन समोर)

याशिवाय, रुग्णालयात इतर अनेक समस्या देखील आहेत. रुग्णालयात पिण्याच्या पाण्याची सोय नाही, स्वच्छतेचा अभाव आहे, इन्व्हर्टर बंद असल्यामुळे वीजेची समस्या कायम आहे आणि डॉक्टर निर्धारित वेळेत उपस्थित राहत नाहीत. OPD वेळेत देखील डॉक्टरांची अनुपस्थिती असते, ज्यामुळे रुग्णांना अत्यंत अडचणींचा सामना करावा लागतो. या सर्व समस्यांवर त्वरित उपाययोजना करण्यात यावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Advertisement

Topics mentioned in this article