देवा राखुंडे, प्रतिनिधी
Dyaneshwar Mauli Palkhi Video : सासवडकर यांचा निरोप घेऊन श्री ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा सोन्याच्या जेजुरीत विसावला आहे.सायंकाळी 6.15 मिनिटांच्या सुमारास पालखी सोहळ्याचे जेजुरी नगरीत आगमन झालं.त्यानंतर मुक्त भंडार खोबऱ्याची उधळण करत या पालखी सोहळ्याचं मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं. यावेळी भक्तीमय वातावरणाने जेजुरी नगरी दुमदुमून निघाली.
भंडारा उधळत,टाळ-मृदंगाच्या गजरात आणि "ज्ञानोबा-तुकाराम"च्या जयघोषात सोन्याच्या जेजुरीत माऊलींचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आलं. यंदाही "माऊली आणि खंडेरायची भेट"झाल्याची भावना भाविकांमध्ये व्यक्त होत असून जेजुरीत वैष्णवांचा महासागर उसळल्याचे चित्र पाहायला मिळाले.
नक्की वाचा >> Pandharpur News: पंढरपूरच्या 'या' गावात सुरुय नको तो खेळ! सर्व महिला एकत्र आल्या अन् थेट पोलीस स्टेशनच गाठलं
ज्ञानोबा माऊलींच्या पालखीचा मन प्रसन्न करणारा व्हिडीओ
पालखी आगमनाच्या क्षणी भक्तांनी भंडारा उधळत माऊलींचे दर्शन घेतले आणि विठ्ठलनामाच्या गजरात परिसर दुमदुमून गेला.पालखी आगमनामुळे जेजुरीत भक्ती,श्रद्धा आणि उत्साहाचे अनोखे वातावरण निर्माण झाले आहे.हजारो वारकरी आणि भाविकांनी माऊलींच्या दर्शनाचा लाभ घेतला.