मराठवाडा हादरला, 3 जिल्ह्यांना पहाटे भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये घबराट

Earthquake In Marathwada : छत्रपती संभाजीनगर नांदेड, हिंगोली जिल्ह्यातील काही ठिकाणी भूकंपाचे धक्के बसल्याचे समोर आले आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

मराठवाडा बुधवारी 10 जुलै रोजी भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला. मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांना भूकंपाचा धक्का बसला आहे. छत्रपती संभाजीनगर नांदेड, हिंगोली, परभणी जिल्ह्यातील काही ठिकाणी तर तर विदर्भातील वाशीममध्ये भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती समोर आले आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू आखाडा बाळापूरपासून 13 किमीवरील दांडेगाव परिसर असल्याचे सांगितले जात आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही वित्तहानी अथवा जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर येत आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाची तीव्रत 4.5 रिश्टर स्केल एवढी होती. बुधवारी सकाळी 7 वाजून 15 मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. 

नक्की वाचा- पुणेकरांची चिंता वाढली, नव्या 9 झिका रुग्णांची नोंद; आकडा 15 वर

भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर नागरिकांनी भीतीने घराबाहेर पळ काढला. तर अनेक ठिकाणी घरांना भेगा गेल्याची माहिती देखील समोर येत आहे. 

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील काही भागातही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याचा दावा नागरिकांकडून केला जातो आहे. पैठण तालुक्यातील पाचोड येथे सकाळी 7.15  मिनिटांनी सौम्य धक्का जाणवला आहे.

Advertisement

(नक्की वाचा - उत्तर प्रदेशात बस-ट्रकमध्ये भीषण अपघात, 18 प्रवाशांचा मृत्यू)

परभणी शहर, सेलू, गंगाखेड आदी भागातही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. तर हिंगोलीच्या पिंपळदरी, राजदरी, वसमतमध्ये भूकंपाचे सौम्या झटके जाणवले आहेत. 2 महिन्यांपूर्वीही या भागात भूकंपाचे धक्के जाणवले होते. वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे गाव आणि परिसरात नेहमीच जमिनीत गूढ आवाज येत असतात.  

Topics mentioned in this article