
मुंबई: एकनाथ शिंदेंनी बंड केलं अन् उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवरुन पायउतार व्हावे लागले. महाराष्ट्राच्या राजकारणात घडलेल्या या सर्वात मोठ्या सत्तानाट्यानंतर एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये घमासान सुरु आहे. या सत्तानाट्यानंतर आज पहिल्यांदाच एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले. यावेळी आदित्य ठाकरेंनी दाखवलेल्या करारी बाण्याची अन् स्वॅगची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
नेमकं काय घडलं?
मुंबईतील रस्त्यांच्या कामाची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी व्हावी, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली होती. याचसंदर्भात आज मुंबईतील सर्व आमदारांची बैठक बोलावण्यात आली. विधानसभा अध्यक्षांच्या दालनात झालेल्या या बैठकीला मुंबईतील सर्व आमदारांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरेही उपस्थित होते.
या बैठकीनिमित्त एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे पहिल्यांदाच आमने- सामने आले. विधानसभा अध्यक्षांनी बैठकीला सुरुवात केल्यानंतर एकनाथ शिंदे उशिरा पोहोचले. दालनामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एन्ट्री होताच सर्वजणांनी उभे राहून त्यांचे स्वागत केले. मात्र आदित्य ठाकरे आपल्या जागेवरुन तसुभरही हलले नाहीत. ते शांतपणे आपल्या खुर्चीत बसून राहिले. महत्त्वाचं म्हणजे शिंदेना पाहताच त्यांनी तोंडही फिरवल्याचे व्हायरल व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे.
या बैठकीत आदित्य ठाकरे यांनी रस्त्याच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत आर्थिक गुन्हेशाखेकडून याची चौकशी केली पाहिजे, अशी मागणी केली. सर्वच आमदारांनी आक्रमक पवित्रा घेतल्यामुळे बैठकीत वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळाले. एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे यांच्यामधघ्ये एकाच खुर्चीचे अंतर होते. यावेळी ते एकनाथ शिंदेकडे करारी नजरेने बघत होते मात्र शिंदेंनी आदित्य ठाकरेंकडे बघायचे टाळले.
दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आदित्य ठाकरे यांच्यासह या बैठकीला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मंत्री आशिष शेलार, वरुण सरदेसाई, आमिन पटेल, महेश सावंत, ज्योती गायकवाड, अतुल भातखळकर, मिहीर कोटेजा यांच्यासह मुंबईतील आमदार तसेच नेत्यांची उपस्थित होते.
Kunal Kamra News: '...तरच माफी मागणार', राडा, तोडफोड, धुमश्चकीनंतर कुणाल कामरा थेट बोलला!
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world