Vidhan Sabha : 2019 पासून अब्दुल सत्तारांच्या जंगम संपत्तीत वाढ; शिंदेंच्या शिलेदाराची किती आहे संपत्ती? 

महायुतीचे उमेदवार अब्दुल सत्तार यांनी बुधवारी सिल्लोड-सोयगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल केला.

जाहिरात
Read Time: 2 mins
सिल्लोड:

मोसिन शेख, प्रतिनिधी

महायुतीचे उमेदवार अब्दुल सत्तार यांनी बुधवारी सिल्लोड-सोयगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल केला. यासोबत दिलेल्या शपथपत्रात त्यांनी आपल्या स्थावर आणि जंगम मालमत्तेचा तपशील दिला आहे. निवडणूक अधिकाऱ्यांकडे दिलेल्या प्रतिज्ञापत्रात अब्दुल सत्तार यांच्याकडे एकूण 6 कोटी 85 लाख 27 हजार 601 रुपयांची मालमत्ता असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

सत्तार यांची मालमत्ता

  • अब्दुल सत्तार यांच्याकडे 5 कोटी 43 हजार 651 रुपयांची जंगम मालमत्ता आहे.
  • 1 कोटी 84 लाख 83 हजार 950 रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. 
  • सत्तारांच्या पत्नींच्या नावे 3 कोटी 97 लाख 29 हजार 936 रुपयांची जंगम मालमत्ता आहे
  • 40 लाख 6 हजार 740 रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. 
  • सत्तार यांच्याकडे 3 लाख 20 हजार रुपयांची शासकीय देणी आहे.
  • सत्तारांनी 39 लाख 49 हजार 30 रुपयांचे बँकेकडून कर्ज घेतले आहे. 
  • विविध बँकांमध्ये त्यांनी 65 लाख 29 हजार 570 रुपयांच्या ठेवी ठेवल्या आहेत. 
  • त्यांच्याकडे 5 लाख 90 हजार 416 रुपयांची रोख रक्कम आहे. 

नक्की वाचा - ठाकरेंचा नातेवाईक ते भाजपामधून आयात उमेदवार, शिवसेना (उबाठा) पक्षाच्या यादीची 5 वैशिष्ट्य

  • तसेच 15 तोळे सोने असून, 7 लाख 91 हजार 583 रुपयांचे हिरे त्यांच्याकडे आहेत. 
  • तसेच त्यांचे महिंद्रा इंटरप्राइजेस या कंपनीत 12 लाख 50 हजार रुपयांचे, तर विविध सहकारी संस्थांमध्ये 26 हजार 705 रुपयांचे, ए एस अजंता कन्स्ट्रक्शनमध्ये 2 कोटी 55 लाख 92 हजार 801 रुपयांचे शेअर्स आहेत. 
  • त्यांच्याकडे एक इनोव्हा कार आहे. 
  • त्यांचे 2023-24 चे एकूण उत्पन्न 94 लाख 95 हजार 456 रुपये आहे. 
  • सत्तार यांचे शिक्षण 1984 मध्ये बीए एफवायपर्यंत झाले असून त्यांच्याविरुद्ध एकूण 6 गुन्हे दाखल आहेत.
  • अब्दुल सत्तार यांच्या जंगम संपत्तीत वाढ झाली असून, स्थावर संपत्ती मात्र घट झाली आहे.

2019 मध्ये सत्तार यांच्याकडे 3 कोटी 69 लाख 93 हजार 941 जंगम संपत्ती आहे. आता 5 कोटी 43 हजार 651 रुपयांची जंगम मालमत्ता आहे. त्यामुळे 3 कोटी 64 लाख 50 हजार 290 रुपयांची जंगम मालमत्ता वाढली आहे. तर 2019 मध्ये सत्तार यांच्याकडे स्थावर संपत्ती 8 कोटी 39 लाख 96 हजार 891 रुपयांची होती. आता 1 कोटी 84 लाख 83 हजार 950 रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. त्यामुळे 6 कोटी 55 लाख 12 हजार 941 रुपयांची स्थावर संपत्ती घटली आहे.