
Toll Free For Electric Vehicle: गणेशोत्सव एवघ्या एका आठवड्यावर आला आहे. गणपती उत्सवाला गावी जाण्यासाठी मुंबई, पुण्यातील चाकरमान्यांची लगबग आता सुरु झाली आहे. अशातच वाहन चालकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. इलेक्ट्रिक वाहनधारकांना आता मोठा दिलासा मिळणार असून अटल सेतू तसेच समृद्धी महामार्गावरुन टोल फ्री प्रवास करता येणार आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, इलेक्ट्रॉनिक कार चालकांना आजपासून दिलासा मिळणार आहे. कारण अटल सेतूवर त्यांना टोल फ्री प्रवास करता येणार आहे. अटल सेतूवर इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफीची घोषणा एप्रिल महिन्यात करण्यात आली होती. त्यानंतर आज पाच महिन्यांनी त्याची अंमलबजावणी होताना दिसत आहे.
राज्यातील मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग 'व समृद्धी महामार्ग या दोन महामार्गावरही येत्या दोन दिवसांत इलेव्ट्रिक वाहनांसाठीची ही टोल माफी लागू होण्याचे संकेत आहेत. त्यामुळे गावी जाणाऱ्या चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग, मुंबई पुणे एक्सप्रेस वे आणि मुंबईचा अटल सेतू या महामार्गांवर इलेक्ट्रिक वाहनांना टोल फ्री करण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती.
या वाहनांना टोल माफ
इलेक्ट्रिक बसेस
खासगी व प्रवासी हलकी चारचाके वाहने
राज्य परिवहन महामंडळाची प्रवासी वाहने
शहरी परिवहन उपक्रमांच्या बस
Fastag Annual Pass: पुणे जिल्ह्यातल्या 'या' टोलनाक्यांवरही सुरु झाला फास्टॅग, वाचा सर्व माहिती
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world