आजचं राजकारण जातीवर चाललंय. आता जातीनिर्मूलन भानगडीपेक्षा जाती कशा दुरुस्त करता येईल, जाती टिकव्यात मात्र तरीही जातीभेद कसे नाहीसे करता येईल असा नवीन पर्यायांचा विचार करायला हवा. तुम्ही असा पर्याय शोधेपर्यंत जात राहणार. त्यामुळे जात निर्मूलनाची बकवासी बंद केलेली बरी, कारण जात काही जात नाही. ती उलट वाढत आहे. देशभरात जातीयता वाढत आहे. आता संविधानातच त्याची व्यवस्था करायला हवी, असं मत ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी एका कार्यक्रमादरम्यान व्यक्त केलं.
नक्की वाचा - यशवंतराव ते देवाभाऊ... महाराष्ट्राचे आजवर किती मुख्यमंत्री झाले? कुणाचा कालावधी होता सर्वात जास्त?
जाती म्हणजे काय, त्या काय असाव्यात, त्याचं महत्त्व काय, मागासलेल्या जाती खऱ्या कोणत्या, खोट्या कोणत्या? यानुसार जाती समोर ठेवून आता राजकारण केलं, तर जाती जातील. किमान जातीतील भेद जातील. जाती जाणार नाही. कारण आपला देश अनेक जाती मिळून तयार झाला आहे, असं मत नेमाडे यांनी व्यक्त करत गांधी आणि नेहरूंच्या काळात जातीभेद नव्हता, पण आज एखाद्याचा फॉलोवर हा त्याच्याच जातीचा असतो,हे युपी बिहार पासून सगळीकडेच वाढलेले असताना जातिभेद नाहीसे करण्याच्या भाषा करता कशाला ? असा सवाल देखील राजेंद्र नेमाडें उपस्थित केलाय.
नक्की वाचा - खास शपथविधीसाठी खास तयारी! तुकाराम पगडी सर्वांचं लक्ष वेधणार
सांगलीच्या कुंडल येथे जी.डी बापू लाड पुरस्कार प्रदान समारंभ प्रसंगी बोलत होते. सध्याचं राजकारण हे जातीवर सुरू असल्याचं ते यावेळी म्हणाले. यावेळी त्यांनी पूर्वीच्या काळी राजकारण कसं चालत होतं, याचाही उल्लेख केला. पूर्वी नेहरू आणि गांधींच्या काळात असं नव्हतं. गांधी बनिया असले तरी त्यांच्यासोबत ब्राम्हण, शेड्यूल कास्ट अशा सर्व जातीचे लोक त्यांचे होते.
परंतू आज अमक्याचा फॉलोअर हा त्याच्याच जातीचा असतो. अशी परिस्थिती उत्तर प्रदेश, बिहार अशी देशभरात वाढत आहे. अशी परिस्थिती असताना जाती निर्मूलनाची भाषा करताच कशाला? असाही सवाल त्यांनी उपस्थित केला. जातीरचना आजपर्यंत खोलवर गेली आहे, जातीरचनेचं निर्मूलन करणं खरचं शक्य आहे का? नुसतं बोलून..बकवास करून चालेल का? जातीविषयी लिहिणाऱ्यांच्या लिखाणातही मोठ्या प्रमाणात जातीयता आहे, असं म्हणत भालचंद्र नेमाडेंनी लेखकांचाही कानउघडणी केली.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world