जाहिरात

Emerging Business Conclave Mumbai Chapter : मुंबई-गोवा महामार्गावरील 354 किमीपैकी 27 किमीवर खड्डे - उदय सामंत

पुढील वर्षापर्यंत मुंबई-गोवा हायवे खड्डे मुक्त करणार असल्याचा विश्वास उदय सामंत यांनी व्यक्त केला. 

Emerging Business Conclave Mumbai Chapter : मुंबई-गोवा महामार्गावरील 354 किमीपैकी 27 किमीवर खड्डे - उदय सामंत

Emerging Business Conclave Mumbai Chapter :  महाराष्ट्र आणि देशाच्या विकासाला चालना देण्यासाठी एनडीटीव्ही मराठीने 'इमर्जिंग बिझनेस कॉन्क्लेव्ह, मुंबई चॅप्टर' या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यावेळी सांस्कृतिक मंत्री, मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी महत्त्वाच्या मुद्द्यांवर प्रकाशझोत टाकला. 

सध्या मुंबई-गोवा हायवेवरील (Mumbai Goa Highway Potholes) खड्डयांवरुन विरोधक राज्य सरकारला घेराव घालत आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या कोकणवासीयांना मुंबई-गोवा हायवेवरील खड्ड्यांमुळे खूप त्रास सहन करावा लागत असल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान उदय सामंत यांनी एनडीटीव्ही मराठी 'इमर्जिंग बिझनेस कॉन्क्लेव्हमध्ये या मुद्द्यांवर आपली भूमिका मांडली. ते यावेळी म्हणाले, मुंबई गोवा महामार्गाला खड्डे पडले हे चुकीचे आहे. मुंबई गोवा महामार्गावरील 354 किलोमीटरपैकी 27 किलोमीटरवर खड्डे आहेत. एकूण रत्नागिरीपर्यंतचा प्रवास 354 किलोमीटर आहे. यापैकी फक्त 27 किलोमीटरवर खड्डे आहेत. तेही माणगाव आणि इंदापूर याठिकाणी ट्रॅफिक जाम होतं. आरवलीजवळ साडेचार किमीवर काम सुरू असल्याने तिथे खड्डे आहेत. मी काल मुंबई गोवा महामार्गावरुन प्रवास केला. मला इथून यायला आठ तास लागले. मात्र पुढच्या गणपतीमध्ये अशी स्थिती येणार नाही. पुढील वर्षापर्यंत मुंबई-गोवा हायवे खड्डे मुक्त करणार असल्याचा विश्वास उदय सामंत यांनी व्यक्त केला. 

Emerging Business Conclave : मराठीचं शिक्षण देणाऱ्या APP ची निर्मिती करणार; भाषा वादावर उदय सामंतांचा उपाय

नक्की वाचा - Emerging Business Conclave : मराठीचं शिक्षण देणाऱ्या APP ची निर्मिती करणार; भाषा वादावर उदय सामंतांचा उपाय

मराठी विरुद्ध अमराठी वादाच्या मुद्द्यावर उदय सामंत म्हणाले, उद्धव ठाकरेंनी हिंदी सक्ती करुन आता मराठीचे गुणगाण गाणे चुकीचे आहे. 'म' मराठीचा राहिलेला नाही, 'म' आता महापालिकेचा आणि मतांचा झाला आहे. मराठी भाषा येत नसेल तर शिकावी. 

पुढील दोन महिन्यात आम्ही एक उपक्रम राबवणार आहोत. महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाला मराठी बोलता यायला हवं. महिनाभरात पहिल्या पाच हजार अमराठी लोकांसाठी एक अॅप तयार करतोय. त्यांना शालेय शिक्षण विभागामार्फत मोफत मराठी शिकवणी दिली जाणार आहे. महाराष्ट्रातील प्रत्येकाला मराठी यायला हवी अशी आमची इच्छा आहे. मात्र त्यावर कानशिलात लगावणं हा उपाय नाही. त्यापेक्षा आपण अॅप तयार करू. जर त्याने शिकायला नकार दिला तर त्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.  मात्र मराठी भाषा शिकविण्यासाठी मारहाण करणं योग्य नाही. त्याऐवजी आम्ही अॅप तयार करतोय. मात्र अमराठी लोकांनी वेळ काढून या अॅपच्या (Marathi learning app) साहाय्याने मराठी भाषा शिकायला हवी. शिकायला नकार दिला त्यावर मात्र कायदेशीर बाबी तयार असल्याचं उदय सामंत यावेळी म्हणाले. 

आम्ही ज्ञानेश्वरी ई बूकमध्ये आणली, आता तुकारामांची गाथा ई बूकमध्ये आणत आहोत. यात कुठे विरोधकांनी कधी लक्ष दिलं का? विरोधकांना केवळ मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मराठीचं राजकारण करायचं आहे.

उदय सामंतांचे जरांगेंना आवाहन

काही गोष्टी संयमाने केल्या पाहिजेत, असं माझे मत आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना सरकारने देवेंद्रजी आणि अजित पवार यांच्या साथीने १० टक्के मराठा आरक्षण दिलं आहे. सारथीमध्ये किंवा अन्य महामंडळांमध्ये मराठा समाजाच्या मुलांना कसे न्याय देता येईल. याबाबत सरकारची भूमिका आहे. मराठी समाजाच्या कोणत्याही व्यक्तीवर अन्याय होणार नाही, ही देखील सरकारची भूमिका आहे, असं उदय सामंत यांनी स्पष्ट केले. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com