
नागिंद मोरे, धुळे
माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्याविरोधात 2016 मध्ये निराधार आरोप केल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना शिरपूर न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध न्यायालयात हजर राहण्याचे वॉरंट जारी केले आहे. त्यांना 23 सप्टेंबर 2025 रोजी न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मानहानीचा गुन्हा
या प्रकरणी शिरपूर येथील डॉ. मनोज महाजन यांनी 12 ऑगस्ट 2016 रोजी अंजली दमानिया यांच्याविरोधात भारतीय दंड विधानातील कलम 499 (मानहानी) आणि 500 (मानहानीसाठी शिक्षा) अंतर्गत फिर्याद दाखल केली होती. ही फिर्याद वकील अमित जैन आणि सुधाकर पाटील यांच्यामार्फत दाखल करण्यात आली होती.
(नक्की वाचा- Mumbai News: मुंबईत राहणाऱ्या हिंदी भाषिकांना मराठी भाषा शिकण्याचे अभियान, 'या' पक्षाने घेतली जबाबदारी)
2016 मध्ये अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषदा आणि विविध वृत्तवाहिन्यांच्या मुलाखतींमध्ये एकनाथराव खडसे यांच्यावर अनेक आरोप केले होते. या आरोपांमुळे खडसे यांच्यासह भारतीय जनता पक्षाची प्रतिमा मलिन झाल्याचा
(नक्की वाचा- Panvel MNS News: राज ठाकरेंचे भाषण, काही तासात मनसेचे 'खळ-खट्याक'; पनवेलमध्ये लेडीज बार फोडला)
शिरपूर पोलिसांनी साक्षीदारांचे जबाब नोंदवून तपास अहवाल न्यायालयात सादर केला. त्यानंतर या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली. मात्र, सुनावणीदरम्यान अंजली दमानिया न्यायालयात हजर राहिल्या नाहीत. यामुळे न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध 'बी डब्ल्यू' वॉरंट जारी करण्याचे आदेश दिले आहेत. हे प्रकरण पुढील कार्यवाहीसाठी एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 23 सप्टेंबर 2025 रोजी होणार आहे, ज्यात दमानिया यांना हजर राहणे बंधनकारक असेल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world