आमच्यासोबत असाल तर...! मेहुण्यांना अशोक चव्हाणांनी सल्ला दिला का इशारा ?

खतगावकर यांची सून, मीनल खतगावकर यांना काँग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी देऊ केली असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांना नायगाव मतदार संघातून काँग्रेसकडून तिकीट देण्याचे आश्वासन देण्यात आल्याचे कळते आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
नांदेड:

लोकसभा निवडणुकीत लागलेल्या निकालांमुळे विविध पक्षांतून भाजपमध्ये आलेल्या काही नेत्यांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे. पूर्वी काँग्रेसमध्ये असलेले नंतर भाजपमध्ये आलेले नांदेडचे एक नेतेही भाजपमध्ये अस्वस्थ आहेत. ते लवकरच स्वगृही परतणार आहेत. गेल्या दहा वर्षांत खतगावकरांनी विविध पक्ष बदलले आहेत. खतगावकरांनी आपण लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची घोषणा केली आहे.

हे ही वाचा : अमित ठाकरेंनी आमच्या मतदारसंघातून लढावे! मनसेच्या पदाधिकाऱ्याने व्यक्त केली इच्छा

भास्कर खतगावकर यांची सून, मीनल खतगावकर यांना काँग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी देऊ केली असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांना नायगाव मतदार संघातून काँग्रेसकडून तिकीट देण्याचे आश्वासन देण्यात आल्याचे कळते आहे. यामुळे त्या काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत त्यांच्यासोबत भास्कर खतगावकरही काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. मेहुण्यांच्या भाजप सोडून जाण्याच्या निर्णयासंदर्भात अशोक चव्हाणांना विचारले असता त्यांनी खतगावकरांना सल्लावजा इशारा दिला आहे. 

हे ही वाचा: 'तुमच्या घरगुती कलहापायी बारामतीकरांवर ओझ लादू नका', निनावी पत्राद्वारे 'गब्बर'चा शरद पवारांवर निशाणा

नांदेडमध्ये माध्यमांशी बोलताना अशोक चव्हाणांनी म्हटले की 'खतगावकर आमच्याकडे राहिले तर सुरक्षित राहतील मी इतकेच सांगू शकतो.' चव्हाणांनी आपल्या मेहुण्यांना दिलेला हा सल्ला आहे का इशारा याची चर्चा सध्या नांदेडमध्ये सुरू आहे. 

चव्हाणांचा जरांगेंनाही सल्ला

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली आहे.  माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनी मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांनाही सल्ला दिला आहे. चव्हाणांनी म्हटले की, मराठा आरक्षणाचा प्रश्न समन्वयातून सुटलेला आहे. मराठा समाजातील अनेकांना कुणबी प्रमाणपत्रे मिळाली असून त्याआधारे अनेकांना नोकऱ्याही मिळाल्या आहेत. यामुळे जरांगेंनी उपोषण करू नये असे चव्हाणांनी म्गटले आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी समन्वयातून मार्ग काढण्याची सरकारची भूमिका असून जरांगे यांनी त्याला प्रतिसाद द्यावा असे चव्हाणांनी म्हटले आहे.  

Topics mentioned in this article