
त्रिशरण मोहगावकर
शेतकऱ्याने औताला जुंपुन घेत शेतीची मशागत करत असल्याचा व्हिडीओ संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला. त्यामुळे सर्वांचेच मन हेलावून गेले. अंबादास पवार यांनी औताला जुंपुन घेतल्याची बातमी NDTV मराठीने दाखवली होती. त्यानंतर जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची व्यथा सर्वां समोर मांडली होती. या पार्श्वभूमीवर सहदेव होनाळे हा शेतकरी भावनीक झाला. शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहीजे. त्यांचा हक्क त्यांना मिळाला पाहीजे यासाठी तो आता रस्त्यावर उतरला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अहमदपूर तालुक्यातील धानोरा येथील शेतकरी सहदेव होनाळे. हा उच्चशिक्षीत मात्र मातीशी नाळ जोडून मातीशीच इमान राखणारा शेतकरी. तीन भावांमधे 8 एकर वडिलोपार्जीत शेती त्याच्याकडे आहे. चळवळीत वाढलेला सहदेव होनाळे अनेकदा शेतकऱ्यांच्या मुद्दयांवर निदर्षने आंदोलने केली आहेत. मात्र सरकारला जाग येत नसल्याची खंत होनाळे यांनी व्यक्त केली आहे. NDTV मराठीने प्रसिद्ध केलेली हडोळतीच्या पवार कुटुंबाची बातमी पाहिल्यानंतर मन हेलावून गेले असं तो सांगतो.
मात्र एकट्या पवार कुटुंबाची ही व्यथा नसून तालुक्यात जिल्हयातच नव्हे तर महाराष्ट्रात अनेक शेतकरी त्याच परिस्थीतीतून जात आहेत असं तो म्हणाला. मदत मिळवण्यासाठी , सरकारला पाझर फोडण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याला जू खांद्यावर घ्यावे लागेल का? असा संतप्त सवालाही होनाळे विचारत आहेत. मराठवाड्यात होणारा अत्यल्प पाऊस , निघणाऱ्या उत्पन्नाला मिळणारा तुटपुंजा भाव आणि शेतकऱ्यांच्या बाबतीत उदासीन असणारे लोकप्रतिनिधी यामुळे शेतकऱ्याची कुचंबना होत आहे असं तो म्हणाला.
त्यामुळे शेतकऱ्यांची व्यथा सांगण्यासाठी होनाळे यांनी पुढाकार घेतला आहे. शेतकऱ्याचे जिवन आनंदी व्हावे. त्याला समाधान मिळाले. त्याला ही सन्मानाने जगता यावे. त्यासाठी सरकारने प्रयत्न करणे गरजेचे आहे. सरकारने शेतकऱ्यांना अनेक आश्वासने दिली आहेत. ती प्रत्यक्षात येणे गरजेचे आहे. त्यासाठी होनाळे थेट मुंबईला निघाले आहेत. ते तिथं मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. मुंबईला ते पायी निघाले असून सरकारला जागं करण्यासाठी त्यांनी खांद्यावर नांगर ही घेतला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आपली दखल घेतली. आपल्याला भेट देतील. त्यांना आपण शेतकऱ्यांच्या व्यथा सांगणार आहोत असं ही ते यावेळी म्हणाले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world