पुण्याच्या बाजारात हंगामातील पहिला आंबा दाखल झाला आहे. पुण्याच्या मार्केटयार्ड फळ बाजारात कोकणातील आंबा दाखल झाल्यामुळे पुणेकरांची उत्सुकता अखेर संपली आहे. येत्या एक ते दीड महिन्यात आंब्याचा सीजन महिन्यात सुरू होणार आहे. यंदाच्या हंगामातील केशर आंब्याच्या पहिल्या पेटीचा पुण्यातील मार्केयार्डमध्ये लिलाव करण्यात आला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कोकणातून आलेल्या या आंब्याच्या पेटीची बाबा मिसाळ यांच्या हस्ते विधिवत पूजाही करण्यात आली. दरवर्षी जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात हंगामातील पहिल्या आंब्याची पेटी दाखल होते.
नक्की वाचा - Pune School : तुमची मुलगी सुरक्षित आहे? पुण्यातील प्रसिद्ध शाळेच्या चेंजिंग रुमध्ये आढळला कॅमेरा!
पुण्यातील पहिल्या मानाच्या 5 डझन आंब्याच्या पेटीला 31 हजार रुपये इतकी किंमत मिळाली आहे. म्हणजे एक आंबा साधारण 51 रुपयांना विकला गेला. ही किंमत गेल्या वर्षीच्या 2024 तुलनेत कमी असल्याचं दिसून येत आहे. गेल्या वर्षी पुण्यात पहिल्या हंगामातील चार डझन आंब्याची पेटी 2100 रुपयांना विकली गेली होती. यानुसार, एक आंबा 58 रुपयांना विकला गेला होता. यावरुन गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पहिली पेटी स्वस्त दराने विकली गेली आहे. 2023 मध्येही देवगड हापूसच्या पाच डझन आंब्याच्या एका पेटीला 21 हजार दर मिळाला होता.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world