जाहिरात

Weather Information: गुलाबी थंडीत पसरणाऱ्या धुक्यामागचे कारण काय? जाणून घ्या A टू Z माहिती

अनेक शहरांमध्ये पसरलेली ही धुक्याची चादर मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांसाठी आकर्षण ठरत आहे. दुसरीकडे या धुक्यामुळे शेतीमालाला मात्र फटका बसतो.

Weather Information: गुलाबी थंडीत पसरणाऱ्या धुक्यामागचे कारण काय? जाणून घ्या A टू Z माहिती

राज्यभरात सध्या थंडीची लाट सुरु आहे. या गुलाबी थंडीमध्ये धुक्याची चादर पसरली असून अगदी काही अंतरावरील व्यक्तीही दिसेना अशी परिस्थिती आहे. मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक शहरांमध्ये पसरलेली ही धुक्याची चादर मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांसाठी आकर्षण ठरत आहे. दुसरीकडे या धुक्यामुळे शेतीमालाला मात्र फटका बसतो. गुलाबी थंडीत पसरलेले हे धुके नेमके का पडते? त्याची निर्मिती कशी होते? माहितेय का? नसेल तर जाणून घ्या एका क्लिकवर....

धुके म्हणजे काय?

धुके  हा पाण्याच्या बाष्पाचाच एक प्रकार आहे. धुके म्हणजे पाणी आणि बाष्पाचे अत्यंत सुक्ष्म कण जे हवेत तरंगत असतात. जमिनीलगत तरंगणारे ढग म्हणजे धुके, असंही आपण म्हणू शकतो. धुक्यांमुळे दृष्यता कमी होते. या धुक्यांमुळे वाहनांना अडथळा निर्माण होतो तसेच रेल्वेसेवा आणि विमान सेवाही विस्कळीत होण्याची शक्यता असते.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

धुके कसे तयार होते?

पाणी आणि बाष्पीभवनाएवढे तापमान असल्यास धुक्याची निर्मिती होते. म्हणजेच ज्यावेळी हवेतील तापमान आणि दवबिंदू यांच्यातील फरक 2.5 °C (4.5 °F) पेक्षा कमी असतो तेव्हा धुके तयार होते. जेव्हा पाण्याची वाफ हवेतील लहान द्रव पाण्याच्या थेंबांमध्ये रुपांतरीत होते, तेव्हा धुके तयार होण्यास सुरुवात होते. 

थंडीच्या दिवसात पृथ्वीच्या पृष्ठभागाजवळील उबदार हवेत असलेली पाण्याची वाफ वरील थंड हवेच्या थरांमध्ये मिसळून गोठते. या प्रक्रियेला संक्षेपण असं म्हणतात. हवेमध्ये जास्त संक्षेपण होते तेव्हा त्याचे रुपांतर पाण्याच्या लहान थेंबांमध्ये होते. हे थेंब सभोवताली असलेल्या थंड हवेच्या संपर्कात आल्यास धुराची निर्मिती होते. यालाच शास्त्रीय भाषेत धुक्याची निर्मिती असं म्हणतात. धुके तयार होण्यासाठी लागणारा बाष्पाचा पुरवठा हा जवळ असलेला नदी, तलाव, समुद्र किंवा पाण्याचा प्रवाह असतो. 

(नक्की वाचा-  Success story: आधी नापास झाला मग यशाचा मानकरी ठरला! शेतकऱ्याच्या लेकानं काय केलं?)

धुक्याचे प्रकार कोणते? 

जमिनीलगतच्या हवेचे तापमान दवबिंदूपेक्षाही कमी होते. इथली हवा बाष्पसंपृक्त होते आणि धुक्‍याचा दाट थर तयार होतो. अशा धुक्‍याला प्रारण धुके (Radiation fog) म्हणतात. थंडीच्या दिवसांत बाष्पयुक्त हवा डोंगराच्या वाताभिमुख बाजूवर उताराला अनुसरून वर सरकते आणि हळूहळू थंड होऊन थोड्या उंचीवर धुके तयार होते. यास ऊर्ध्वउतार धुके (Upslope fog) म्हणतात. सह्याद्रीच्या कोकणाकडील उतारावर असे धुके आढळते.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com