जाहिरात
18 hours ago

राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये उन्हाच्या झळांनी नागरिक त्रस्त असताना काही जिल्ह्यांमध्ये मात्र अवकाळीने शेतकऱ्यांचं टेन्शन वाढवलं आहे. अवकाळी पावसामुळे नागपूर, वर्धा, भंडारा आणि गोंदियातील शेतमालाचं मोठं नुकसान झालं आहे. दुसरीकडे गडचिरोली, चंद्रपूर, अकोल्यात तापमानाने चाळीशी पार केली असून सोलापुरात सर्वाधिक 42.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. दरम्यान अनेक भागात नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.  

5 लाख रुपये बक्षीस असलेला नक्षलवादी रूपेश मंडावीने केले आत्मसमर्पण

छत्तीसगड मध्ये नक्षल्यांना अजून एक झटका बसला आहे. आरकेबी डिविजनचा कोतरी एरिया कमेटी सदस्य व एलओएस डिप्टी कमांण्डरने आत्मसमर्पण केले आहे. त्याच्यावर  5 लाख रुपयांचे बक्षीस होते. रूपेश मंडावी असं त्याचे नाव आहे.  पोलिस अधीक्षक वाय. पी. सिंह यांच्या समोर आत्मसमर्पण केले.  

वानखेडे स्टेडियम येथे शरद पवार, अजित वाडेकर, रोहित शर्मा नावाचे स्टँड असणार

वानखेडे स्टेडियम येथे शरद पवार, अजित वाडेकर, रोहित शर्मा नावाचे स्टॅन्ड असणार आहे. या नावाचे  स्टँड असतील अशी माहिती एमसीएचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांची दिली आहे. 

एकनाथ शिंदे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतिर्थावर दाखल

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतिर्थावर दाखल झाले आहेत. मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुका लक्षात घेता ही भेट महत्वाची समजली जाते. 

LIVE Update: विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू

विजेचा झटका लागून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू...

मोहोळ तालुक्यातील शेटफळ येथील घटना

गेल्या 3 तासांपासून शेतकऱ्याचा मृतदेह महावितरणच्या कार्यालयाबाहेर..

महावितरणच्या हलगर्जीपणामुळे 30 वर्षीय मनोज डंके यांचा मृत्यू झाल्याचा आरोप...

विजेच्या झटक्याने एकाच मृत्यू तर इतर दोन जखमी 

संतप्त जमावाला शांत करण्यासाठी पोलिस आणि आमदार राजू खरे घटनास्थळी

LIVE Update: नॅशनल हेराल्ड घोटाळा प्रकरण! ईडीच्या चार्जशीटमध्ये सोनिया गांधी, राहुल गांधींचे नाव

नॅशनल हेराल्ड घोटाळा प्रकरणात ईडीकडून चार्जशीट दाखल करण्यात आले आहे. या चार्जशीटमध्ये काँग्रेस नेत्या सोनिया गांधी तसेच राहुल गांधींचेही नाव आहे. 

LIVE Update: पश्चिम रेल्वेची विरार - डहाणू दरम्यानची वाहतूक विस्कळीत, लोकल गाड्या 20 ते 25 मिनिटे उशिरा

पश्चिम रेल्वेच्या पालघर मधील सफाळे आणि केळवे रोड रेल्वे स्थानका दरम्यान बिकानेर एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. डहाणूपर्यंत धावणारी उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत झाली असून, डहाणूकडे जाणाऱ्या डाऊन मार्गावरील लोकल गाड्या वीस ते पंचवीस मिनिट उशिराने धावत आहेत. डाऊन मार्गावरील पश्चिम रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या गाड्यांवर देखील परिणाम . तर अप लाइन वरील वाहतूक सुरळीत . डहाणू पर्यंत जाणाऱ्या लोकल गाड्या पालघर मधील रेल्वे स्थानकांवर रोखून धरल्या .

Beed News: अंबाजोगाई तालुक्यात सौर ऊर्जा कंपनीच्या प्रोजेक्ट मॅनेजरला जीवे मारण्याची धमकी

बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील जवळगाव येथे सुरू असलेल्या सौर ऊर्जा प्लांटच्या प्रोजेक्ट मॅनेजरला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे..राहुल मोरे असं प्रोजेक्ट मॅनेजर च नाव आहे.. मोरे याला याला नवनाथ हारे, विजय कांबळे यांच्यासह इतर दहा जणांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या प्रकरणात बर्दापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. अंबाजोगाई तालुक्यातील जवळगाव येथे गायरान जमीनीमध्ये हा सौर ऊर्जा प्लांट उभारण्याचे काम सुरू आहे. या ठिकाणी असलेल्या राहुल मोरे या प्रोजेक्ट मॅनेजरला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असून आता या प्रकरणाचा अधिक तपास बर्दापूर पोलीस करत आहेत..

LIVE Update: पुण्यात भरदिवसा दरोडा, 25 ते 30 तोळे सोने लंपास

पुण्यातील सिंहगड रोड परिसरात भर दिवसा दरोडा 

सिंहगड रस्त्यावर असलेल्या ज्वेलर्सच्या दुकानात टाकण्यात आला दरोडा 

प्लास्टीच्या बंदुकीचा धाक दाखवत तीन जणांकडून सोन्याची लूट 

दरोडेखोरानी पळवलं 25 ते 30 तोळे सोनं 

25 ते 30 तोळे सोन तीन जणांकडून लंपास 

नांदेड सिटी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील धायरी परिसरातील घटना 

सोने खरेदीच्या बाहण्याने दुकानात येत खेळण्यातील बंदुकीचा धाक दाखवत केली चोरी

चोरी केल्यानंतर तीनही आरोपी फरार

Live Update : देशात यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस, हवामान खात्याचा अंदाज

देशात यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल असा अंदाज भारतीय हवामान खात्यानं व्यक्त केला आहे. भारतीय अर्थव्यवस्थेसाठी ही अतिशय आनंदाची बातमी आहे. अर्थव्यवस्थेतील 18 टक्के वाटा कृषी क्षेत्राचा आहे. जून ते सप्टेंबर या काळात दीर्घकालीन सरासरीच्या 105 टक्के पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सामान्यपणे १ जूनला केरळमध्ये मान्सूनचे आगमन होतं तर सप्टेंबरच्या मध्यपर्यंत त्याचा देशात मुक्काम असतो.

LIVE Updates: ससून समितीची बैठक सुरू, आज अहवाल सादर करणार

ससून समितीची बैठक सुरू

ससुन रुगणालयाच्या वैद्यकीय समितीत सहा जणांचा समावेश 

आज सहा जणांची समिती अहवाल सादर करणार 

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाची समितीकडून कागदपत्र तपासली जातील

वैद्यकीय अधिक्षक यांच्यासह स्त्री रोग विभाग प्रमुख , औषधशास्त्र विभाग प्रमुख , न्याय वैद्यकीय शास्त्र विभाग प्रमुख , भूल शास्त्र विभाग प्रमुख , बाल रोग तज्ज्ञ विभाग प्रमुख आशा सहा जणांचा समावेश आहे

LIVE Update: भूसंपादनाच्या मोबदल्यावरील व्याजाची रक्कम कमी

शेतकऱ्यांच्या भूसंपादनाचा मोबदला देण्यासंदर्भातल्या नियमात बदल

भूसंपादनाच्या मोबदल्यावरील व्याजाची रक्कम सरकारने केली कमी

शेतकऱ्यांना आता 15% ऐवजी 9 टक्क्यानेच व्याजदराचा  मोबदला मिळणार

सरकारने शेतकऱ्यांची जमीन भूसंपादन केली असेल तर त्यांना पंधरा टक्के व्याजदराने पैसे मिळायचे मात्र आता पंधरा टक्के ऐवजी नऊ टक्क्यानेच पैसे दिले जाणार

या निर्णयामुळे सरकारचा मोठा खर्च  वाचणार

मात्र भूसंपादन केलेल्या अनेक शेतकऱ्यांना याचा  फटका बसणार

Live Update : MPSC चे विद्यार्थी भेटीला, शरद पवार यांचा एमपीएससीचे अध्यक्ष रजनीश सेठ यांना फोन

शरद पवार यांचा एमपीएससीचे अध्यक्ष रजनीश सेठ यांना फोन 

एमपीएससी मधील इडब्ल्यूस, एसइबीसी आरक्षणाच्या संदर्भात येणाऱ्या तांत्रिक अडचणी यावर तत्काळ शासनाने तोडगा काढावा याबाबत शरद पवारांकडून सूचना 

एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आज शरद पवार यांची वाय बी चव्हाण सेंटर येथे भेट घेतली आणि आपल्या विविध मागण्या मांडल्या 

विद्यार्थ्यांकडून जागा वाढी संदर्भात सरकारने निर्णय करावा अशी देखील शरद पवारांकडे मागणी 

विद्यार्थ्यांच्या भेटी नंतर शरद पवारांकडून मुख्यमंत्र्यांना देखील फोन करण्याच आश्वासन

Live Update : पूजा खेडकरला सुप्रीम कोर्टाचा दिलासा कायम

पूजा खेडकरला सुप्रीम कोर्टाचा दिलासा कायम

पुढील सुनावणीपर्यंत पूजाला अटक करता येणार नाही

कोर्टाने 7 दिवसांची मुदत वाढवली

पुढील सुनावणी 21 एप्रिल रोजी होणार

पूजा खेडकर यांच्या वकिलांनी केलेली विनंती कोर्टाकडून मान्य

पूजा खेडकर यांच्या बाजूने आज माजी सरन्यायाधीश उदय लळीत यांचे चिरंजीव श्रेयस लळीत बाजू मांडण्यासाठी उभे राहिले होते.

Live Update : रॉबर्ट वाड्रा यांना ईडीने पाठवलं समन्स

रॉबर्ट वाड्रा यांना ईडीने पाठवलं समन्स

ED कडून वाड्रा यांना दुसऱ्यांदा पाठवलं समन्स

८ एप्रिल रोजी ED चौकशीसाठी हजर न राहिल्याने पाठवलं समन्सवर 

गुरूग्राममधील एका जमिनीशी संबंधित प्रकरणात पाठवलं समन्स.

Live Update : शिवसेना ठाकरे गटाचे नेते माजी आमदार संजय घाटगे आज भाजपमध्ये प्रवेश करणार

शिवसेना ठाकरे गटाचे नेते माजी आमदार संजय घाटगे आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. पक्षाच्या मुंबईतील कार्यालयात दुपारी तीन वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होणार आहे. त्यांच्यासह त्यांचा मुलगा गोकुळचे संचालक अंबरीशसिंह घाटगेभे देखील भाजप प्रवेश करणार आहेत. 

भारतीय बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स 1300 अंकांनी वधारला

भारतीय बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स 1300 अंकांनी वधारला तर निफ्टी सुद्धा उघडताच 400 अंकांच्या उसळीसह  23200 च्या पलीकडे

Live Update : नाशिकमध्ये काँग्रेसला अजून एक धक्का, मालेगावचे प्रसाद बळीराम हिरे यांचा आज भाजपात प्रवेश…

नाशिकमध्ये काँग्रेसला अजून एक धक्का, मालेगावचे प्रसाद बळीराम हिरे यांचा आज भाजपात प्रवेश… 

प्रसाद हिरे हे भाऊसाहेब हिरेंचे नातू असून राज्याचे आरोग्य, पाटबंधारे, ऊर्जा, शिक्षण अशा विविध खात्यांची कॅबिनेट मंत्रीपदे भूषवलेले स्वर्गीय डॉ. बळीरामजी हिरे यांचे चिरंजीव. मुंबईतील भाजपच्या नरीमन पॉइंट येथील कार्यालयात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रसाद हिरे भाजप प्रवेश करणार आहेत. दुपारी 2 वाजता होणाऱ्या प्रवेश सोहळ्यासाठी मालेगावातून 300 पेक्षा अधिक वाहनांनी कार्यकर्ते सकाळी मुंबईला रवाना होणार आहेत. प्रसाद हिरे हे कै. भाऊसाहेब  हिरे स्मरणिका समिती ट्रस्ट या अग्रगण्य शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आहेत. यापूर्वी भाजपकडून विधानसभा, विधान परिषद निवडणूक लढले आहेत. 

Live Update : पुण्यात होणाऱ्या MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला अखेर पोलिसांची परवानगी

पुण्यात होणाऱ्या MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला अखेर पोलिसांची परवानगी 

आज आंदोलन मोठं होण्याची शक्यता होती. मात्र अटी-शर्तीसह उद्याच्या आंदोलनाला परवानगी देण्यात आली आहे. कंबाइन परीक्षेच्या जागा वाढीसाठी विद्यार्थी आंदोलन करणार आहेत. त्यासोबत SEBC-EWS च्या निकालात झालेल्या चुकींच्या विरोधात आंदोलन करणार आहेत.