जाहिरात

शेत जमिनीचा वाद, माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या मेव्हण्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल

धनंजय मुंडे यांच्या मेव्हण्याविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेत जमिनीचा वाद, माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या मेव्हण्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल

Dhananjay Munde : सांगलीच्या मिरज तालुक्यातील बेडग येथे शेतजमिनीचा ताबा घेण्यासाठी मारहाण, दमदाटी करून शेतीतील झोपडी पाडल्या प्रकरणी माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे मेहुणे व युवा राष्ट्रवादीचे माजी पदाधिकारी जितेंद्र ऊर्फ बाळासाहेब ओमासे यांच्यासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरीकडे जाणून बुजून आपल्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचं बाळासाहेब ओमासे यांच्याकडून सांगण्यात आलं आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे मेहुणे जितेंद्र उर्फ बाळासाहेब उमासे यांनी मिरज तालुक्यातील बेगड येथे जमिनीच्या वादातून झोपडी पाडण्यासह जमिनीचा ताबा घेऊन मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. बेगड येथे सुरेश आणि राहुल उमासे आपल्या कुटुंबासह राहतात. बेगड येथे 64 गुंठे शेतजमीन आहे. बाळासाहेब उमासे यांनी आपल्या जमिनीचा ताबा घेण्यासाठी मारणार केल्याची तक्रार राहुल उमासे यांनी केली होती. त्यानंतर बाळासाहेब उमासे यांच्यासह पाच जणांच्याविरोधात मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Kashmir Pahalgam terror attack : महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात 700 पेक्षा जास्त पाकिस्तानी नागरिकांचं वास्तव्य

नक्की वाचा - Kashmir Pahalgam terror attack : महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात 700 पेक्षा जास्त पाकिस्तानी नागरिकांचं वास्तव्य

मात्र धनंजय मुंडे यांचे मेहुणे बाळासाहेब ओमासे यांनी त्यांच्यावरील आरोप नाकारले आहेत. मार्च महिल्यात त्याचा निकाल आपल्या बाजूने लागला.  ते पुढे  म्हणाले की, बेगड येथील शेत जमिनीचा वाद मिरज न्यायालयात सुरू होता. ही जमीन माझ्या पत्नीला तिच्या आजीने दिली होती. या जागेवर आपणच झोपडी बांधली. निकाल आपल्या बाजूने लागण्याच्या रागातून आपल्यावर हा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे,पण हा सर्व प्रकार न्यायालयाच्या निदर्शनास आणून देणार असल्याचं बाळासाहेब ओमासे यांनी स्पष्ट केले आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: