Political News: सांगलीत अजित पवार गटाची ताकद वाढणार; चार माजी आमदार राष्ट्रवादीत प्रवेश करणार

माजी मंत्री शिवाजीराव नाईक, अजितराव घोरपडे, माजी आमदार विलासराव जगताप, राजेंद्रअण्णा देशमुख तसेच जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती तमनगौडा रवी पाटील या पाचही नेत्यांचा राष्ट्रवादी अजित पवार गटात  मुंबईत प्रवेश होणार आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

शरद सातपुते, सांगली

Sangli News: सांगली जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत. कारण जिल्ह्यातील चार माजी आमदारासह जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. माजी मंत्री शिवाजीराव नाईक, अजितराव घोरपडे, माजी आमदार विलासराव जगताप, राजेंद्रअण्णा देशमुख तसेच जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती तमनगौडा रवी पाटील या पाचही नेत्यांचा राष्ट्रवादी अजित पवार गटात  मुंबईत प्रवेश होणार आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा)

शिवाजीराव नाईक व राजेंद्रअण्णा देशमुख हे सध्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात आहेत. विलासराव जगताप हे भाजपमधून बाहेर पडले आहेत. अजितराव घोरपडे हे सध्या कोणत्याच पक्षात सक्रिय नव्हते. या चारही नेत्यांच्या गेल्या काही दिवसांपासून मिरजेत बैठका सुरू आहेत. राजकीय भवितव्यासाठी कोणत्या पक्षात जायचे, याचा निर्णय घेण्यासाठी त्यांच्या चार बैठका झाल्या. अखेर त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेशाचा निर्णय घेतला.

(नक्की वाचा-  Raj and Uddhav Thackeray : ठाकरे बंधुनी या 5 गोष्टीसाठी एकत्र यावं; मुंबईत ठिकठिकाणी बॅनर्स)

रवी तमन गौडा पाटील हे भाजपचे नेते होते ते जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती होते. जतमधून त्यांना भाजपने उमेदवारी नाकारल्यानंतर ते गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात अपक्ष लढले व त्यांचा पराभव झाला होता. आज हेही राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करत आहेत. 

आज 22 एप्रिल रोजी मुंबईत अजित पवार यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्ष प्रवेश होणार आहे. पाचही नेत्यांचा पक्षप्रवेश झाल्यानंतर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाची जिल्ह्यातील ताकद वाढणार आहे.

Advertisement

(नक्की वाचा-  Pawar Politics : पवार काका-पुतण्यांमध्ये नवी राजकीय खिचडी शिजतीय? वाचा का आहे ठाकरेंची सेना अस्वस्थ?)

राष्ट्रवादीच्या विभाजनावेळी जिल्ह्यातील एकही मोठा नेता अजित पवार गटात गेला नव्हता. काही महिन्यानंतर महापालिकेच्या काही माजी नगरसेवकांच्या पक्ष प्रवेशाच्या माध्यमातून अजित पवार गटाला ताकद मिळाली. आता चार माजी आमदारांच्या पक्षप्रवेशानंतर पक्षाला आणखी बळ मिळाल्याचे चित्र आहे.

Topics mentioned in this article