जाहिरात

Jalgoan Crime News: मजामस्ती करताना एक शब्द खटकला; मित्रांनी तरुणाला क्रूरपणे संपवलं

Jalgoan Crime News: हर्षल भावसार हा तरुण जळगाव एमआयडीसीतील एका चॉकलेटच्या कंपनीत कामाला होता. कामावरून घरी आल्यानंतर बाहेर जाऊन येतो असे सांगूत तो घराबाहेर पडला होता.

Jalgoan Crime News: मजामस्ती करताना एक शब्द खटकला; मित्रांनी तरुणाला क्रूरपणे संपवलं

मंगेश जोशी, जळगाव

Jalgoan Crime News: हॉटेलमध्ये जेवताना चोर म्हटल्याच्या रागातून मित्रांनी तरुणाची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. जळगाव शहरातील प्रजापत नगरमध्ये ही घटना घडली आहे. हर्षल प्रदीप भावसार असे हत्या करण्यात आलेल्या 31 वर्षीय तरुणाचे नाव आहे.

जळगाव शहरातील प्रजापत नगर जवळ रेल्वे रुळावर हर्षल भावसार या तरुणाचा मृतदेह आढळला होता. सुरुवातीला अपघातात हर्षलचा मृत्यू झाल्याचे मानले जात होते. मात्र याप्रकरणी पोलिसांनी सखोल तपास केला असता हर्षलचा मृत्यू हा अपघातात नव्हे तर घातपात असल्याचे उघड झाले.

(नक्की वाचा-  Solapur-Akkalkot Highway: सोलापूर-अक्कलकोट मार्गावर कशी होतेय फसवणूक? हा Video बघाच; कमेंट्सही नक्की वाचा)

बाहेर गेला तो परतलाच नाही

हर्षल भावसार हा तरुण जळगाव एमआयडीसीतील एका चॉकलेटच्या कंपनीत कामाला होता. कामावरून घरी आल्यानंतर बाहेर जाऊन येतो असे सांगून तो घराबाहेर पडला होता. मात्र हर्षल रात्री घरी परतलाच नाही. दुसऱ्या दिवशी रेल्वे रुळावर हर्षलचा अपघात झाल्याची माहिती समोर आली.

चोर म्हटल्याने वाद

हर्षलच्या मृतदेहावर जखमा आढळून आल्याने कुटुंबीयांनी हा अपघात नव्हे तर घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला. या संशयावरून पोलिसांनी सखोल चौकशी करत हर्षल हा मित्रांसोबत हॉटेलमध्ये गेला होता आणि त्यावेळी परेश नावाच्या मित्राला हर्षलने "चोर पऱ्या " म्हटल्याने या रागातून मित्रांमध्ये भांडण झालं. मित्रांनी हर्षलला मारहाण केल्याचे समोर आले.

(नक्की वाचा- Pune News: "साहेब माझी मजबुरी आहे...", पुण्यातील तरुणाचा VIDEO व्हायरल, चूक कुणाची सांगा?)

याप्रकरणी पोलिसांनी हॉटेलमधील सीसीटीव्हीवरून या संपूर्ण प्रकाराचा उलगडा केला. शनिपेठ पोलीस स्टेशनमध्ये संशयित भूषण संजय महाजन, लोकेश मुकुंदा महाजन, परेश संजय महाजन या तीन जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. तर भूषण महाजन याला पोलिसांनी अटक केली आहे तर अन्य दोन जण फरार असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com