जाहिरात
Story ProgressBack

जळगावात भीषण दुर्घटना, कारच्या धडकेत बाइकवरील महिलेसह 2 मुलांचा मृत्यू 

Jalgaon Accident: जळगावामध्ये कार आणि बाइकचा भीषण अपघात झाला आहे. या दुर्घटनेमध्ये महिलेसह दोन मुलांचा जागीच मृत्यू झाला आहे.

Read Time: 1 min
जळगावात भीषण दुर्घटना, कारच्या धडकेत बाइकवरील महिलेसह 2 मुलांचा मृत्यू 
अपघातामध्ये महिलेसह दोन लहान मुलांचा मृत्यू (प्रतिकात्मक फोटो - Canva)

मंगेश जोशी, जळगाव

Jalgoan Accident: जळगावातील रामदेववाडीजवळ भीषण दुर्घटना घडली आहे. भरधाव कारची बाइकला धडक बसल्याने तीन जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एका महिलेसह दोन लहान मुलांचा समावेश आहे. भरधाव कारमुळे बाइकवरील प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. अपघातातील जखमींवर जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. 

(नक्की वाचा: दिल्लीतील फर्जी गजाआड, कल्याण पोलिसांनी जप्त केल्या हजारोंच्या बनावट नोटा)

मृत पावलेले तीनही जण एकाच कुटुंबातील तसेच रामदेववाडी गावातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. अपघातानंतर ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला. संतापलेल्या ग्रामस्थांनी दगडफेक आणि रास्तारोको करत जळगाव पाचोरा रस्त्यावरील वाहतूक अडवून ठेवली. तसेच संतप्त जमावाने बंदोबस्तामध्ये तैनात असलेल्या पोलिसांनी दगडफेक देखील केली.  

कारच्या धडकेत बाइकवरील तिघांचा मृत्यू

कारच्या धडकेत बाइकवरील तिघांचा मृत्यू
Photo Credit: Reporter- Mangesh Joshi

(नक्की वाचा : डोंबिवलीत घरफोड्या करून उत्तर प्रदेशात बांधला आलिशान बंगला, चोरटे गजाआड)

परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी परिसरामध्ये मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. दरम्यान हा अपघात इतका भीषण होता की कारच्या धडकेनंतर बाइकचा अक्षरश: चुराडा झाला.  

(नक्की वाचा: पालकांनो मुलांवर ठेवा लक्ष! इन्स्टाग्राममुळे अल्पवयीन मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त)

VIDEO: शिवीगाळ, दमदाटी, धमकी; माझ्याशिवाय आहे कोण? अजित पवार गटाच्या आमदाराची दादागिरी

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
डार्क मोड/लाइट मोड बदलण्यासाठी
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination