समाधान कांबळे
मरणानंतर मनुष्याच्या नशिबी अश्या काही घटना येतात की त्यामुळे सर्वच जण आवाक होतात. तशीच एक घडना हिंगोली जिल्ह्यात घडली आहे. हिंगोलीच्या कळमनुरी शहरातील नागरिकांना मरणानंतरही मरण यातना सोसाव्या लागत आहेत. कळमनुरी शहरातील सार्वजनिक स्मशानभूमी कडे जाणाऱ्या रस्त्यावर पूल नाही. अशा वेळी मानवी साखळी करून अंत्ययात्रा नेण्याची वेळ येथील नागरिकांवर आली आहे. ही दृष्य सध्या सोशल मीडियावर व्हायल झाली आहेत.
हिंगोली जिल्ह्यात मागील दोन दिवसापासून पाऊस सुरू आहे. त्यामुळे स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील ओढ्यांना पूर आला होता. काल शनिवारी कळमनुरी शहरातली एका वृद्धाचं निधन झालं होतं. मात्र ओढ्यावरील पाण्याचा ओघ कमी होत नसल्याने बराच वेळ अंत्यसंस्कार करण्यासाठी खोळंबा झाला होता. अशा वेळी करायचं काय असा प्रश्न ग्रामस्थाना पडला होता. शेवटी त्यांनी ओढा ओलांडण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान या पाणी कमी झाल्यानंतर ही अंत्ययात्रा मानवी साखळी तयार करून न्यावी लागली. कळमनुरी शहरातील नागरिकांना पावसाळ्यामध्ये अशा यातना सोसाव्या लागतात. अनेकदा प्रशासनाकडे या रस्त्यावर पूल बांधण्याचे मागणी करून सुद्धा पालिका प्रशासन याची गांभीर्याने दखल घेत नाही. कळमनुरी शहरातील नागरिकांना पावसाळ्यामध्ये स्मशानभूमीकडे जाण्यासाठी अशाच प्रकारचा त्रास सहन करावा लागत असल्याने येथील नागरिक संतप्त झाले आहेत.