जाहिरात

Hingoli News: स्मशानभूमीकडे जाण्यासाठी पूल नसल्याने गुडघाभर पाण्यातून अंत्ययात्रा

हिंगोली जिल्ह्यात मागील दोन दिवसापासून पाऊस सुरू आहे.

Hingoli News: स्मशानभूमीकडे जाण्यासाठी पूल नसल्याने गुडघाभर पाण्यातून अंत्ययात्रा
हिंगोली:

समाधान कांबळे 

मरणानंतर मनुष्याच्या नशिबी अश्या काही घटना येतात की त्यामुळे सर्वच जण आवाक होतात. तशीच एक घडना हिंगोली जिल्ह्यात घडली आहे. हिंगोलीच्या कळमनुरी शहरातील नागरिकांना मरणानंतरही मरण यातना सोसाव्या लागत आहेत. कळमनुरी शहरातील सार्वजनिक स्मशानभूमी कडे जाणाऱ्या रस्त्यावर पूल नाही. अशा वेळी मानवी साखळी करून अंत्ययात्रा नेण्याची वेळ येथील नागरिकांवर आली आहे. ही दृष्य सध्या सोशल मीडियावर व्हायल झाली आहेत.  

नक्की वाचा - Bhaskar Jadhav: 'भिडा, नडा, एकटा बास', ब्राम्हण समाज अन् भास्कर जाधवांचं स्टेटस चर्चेत का?

हिंगोली जिल्ह्यात मागील दोन दिवसापासून पाऊस सुरू आहे.  त्यामुळे स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील ओढ्यांना पूर आला होता. काल शनिवारी कळमनुरी शहरातली एका वृद्धाचं निधन झालं होतं. मात्र ओढ्यावरील पाण्याचा ओघ कमी होत नसल्याने बराच वेळ अंत्यसंस्कार करण्यासाठी खोळंबा झाला होता. अशा वेळी करायचं काय असा प्रश्न ग्रामस्थाना पडला होता. शेवटी त्यांनी ओढा ओलांडण्याचा निर्णय घेतला.  

Vande Bharat : आज नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा शुभारंभ, बुकिंगपूर्वी या 5 गोष्टी माहीत असायला हव्यात

दरम्यान या  पाणी कमी झाल्यानंतर ही अंत्ययात्रा मानवी साखळी तयार करून न्यावी लागली. कळमनुरी शहरातील नागरिकांना पावसाळ्यामध्ये अशा यातना सोसाव्या लागतात. अनेकदा प्रशासनाकडे या रस्त्यावर पूल बांधण्याचे मागणी करून सुद्धा पालिका प्रशासन याची गांभीर्याने दखल घेत नाही. कळमनुरी शहरातील नागरिकांना पावसाळ्यामध्ये स्मशानभूमीकडे जाण्यासाठी अशाच प्रकारचा त्रास सहन करावा लागत असल्याने येथील नागरिक संतप्त झाले आहेत.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com