मनिष रक्षमवार, गडचिरोली: शेततळ्यात बुडून दोन सख्ख्या मावस भावांचा मृत्यू झाल्याची काळीज पिळवटून टाकणारी घटना गडचिरोलीमध्ये घडली आहे. गडचिरोलीच्या शिरपूर शेतशिवारात घडलेल्या या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. पोहायला तळ्यात उतरले असता पाण्याचा अंदाज न आल्याने ही मोठी दुर्घटना घडली. या घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
Pune Crime : पुण्यातील संतापजनक कृत्य; महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न
याबाबत सविस्तर माहिती अशी की, कूरखेडा तालूक्यातील शिरपूर शेतशिवारात असलेल्या शेततळ्यात आंघोळीचा गेलेल्या दोन सख्या मावस भावंडांचा पाण्यात बूडत मृत्यु झाल्याची दुखःद घटना घडली. विहान ज्ञानेश्वर मडावी (वय 12 वर्ष रा.शिरपूर) व रूदय ज्ञानेश्वर मडावी (वय 9 वर्ष रा.कूरखेडा (चातगांव, ता.धानोरा हल्ली मु.गडचिरोली) असे मृतक मावस भावांचे नावे आहेत
मृतक मुले सायकलने गावाशेजारी असलेल्या नाजूक मडावी यांचा शेतात असलेल्या शेततळ्यात गेले होते. यावेळी तळ्यात असलेले पाणी बघून त्याना आंघोळीचा मोह आवरता आला नाही. लगेच त्यांनी पाळीवर सायकल व कपडे तसेच चपला काढून ठेवत पाण्यात उतरले. मात्र खोल पाण्याचा त्याना अंदाज न आल्याने पाण्यात बुडून त्यांचा मृत्यु झाला. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले. दोघांचेही मृतदेह उत्तरीय तपासणी करीता रुग्णालयात नेण्यात आले असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.
ऑक्सफर्डची पदवी अन् पीएचडी, तरीही साधी नोकरी; उच्चशिक्षित तरुण का बनला डिलिव्हरी बॉय?