जाहिरात

Gautam Adani Speech: 'एआयमुळे महाराष्ट्राच्या विकासाला चालना', गौतम अदाणी यांचे प्रतिपादन, तरुणांना केलं आवाहन

AI Centre of Excellence inauguration Baramati: कार्यक्रमाला विद्याप्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार यांच्यासह संपूर्ण पवार कुटुंब उपस्थित होते. 

Gautam Adani Speech: 'एआयमुळे महाराष्ट्राच्या विकासाला चालना', गौतम अदाणी यांचे प्रतिपादन, तरुणांना केलं आवाहन

Gautam Adani Speech Baramati:  "कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) हे केवळ तंत्रज्ञान नसून भारताच्या आर्थिक आणि धोरणात्मक स्वातंत्र्याचा नवा आधारस्तंभ आहे. त्यामुळे तरुण पिढीने केवळ एआयचे वापरकर्ते न राहता त्याचे निर्माते बनावे, असे आवाहन अदाणी समूहाचे अध्यक्ष गौतम अदाणी यांनी केले. बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या 'शरद पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स'च्या (CoE-AI) उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला विद्याप्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार यांच्यासह संपूर्ण पवार कुटुंब उपस्थित होते. 

काय म्हणाले गौतम अदाणी?

"मला गेल्या तीन दशकांहून अधिक काळ शरद पवारांना जाणून घेण्याचे सौभाग्य मला लाभले आहे. त्यांच्याकडून मी जे काही शिकलो ते अतुलनीय आहे. त्यांची बुद्धिमता आणि सहानुभूती सर्वाधिक छाप पाडते. मी अनेक वेळा बारामतीला भेट दिली  आणि शरद पवार यांनी येथे जे साध्य केले आहे ते विकासाच्या पलीकडे आहे. त्यांनी शेतीत परिवर्तन घडवले आहे, सहकारी संस्थांना बळकटी दिली आहे आणि उद्योजकतेला प्रोत्साहन दिले आहे, असं गौतम अदाणी म्हणाले.

Gautam Adani : अदाणी समूहाचे चेअरमन गौतम अदाणी बारामतीत; AI सेंटर ऑफ एक्सिलन्सचं केलं उद्घाटन

तसेच यावेळी बोलताना त्यांनी एआय क्रांतीचे महत्त्वही समजून सांगितले. "हे एआय सेंटर शेती, आरोग्यसेवा आणि नवोपक्रमावर लक्ष केंद्रित करेल. एआय आता भारताचा चौथा पाया बनणार आहे. एआय भारताच्या विकासाच्या मार्गाला आकार देईल. एआय महाराष्ट्राच्या विकासाला चालना देईल. भारताने जागतिक एआय स्पर्धेत एक पाऊल पुढे टाकले आहे. एआय आता केवळ तांत्रिक शर्यत राहिलेली नाही, तर जागतिक वर्चस्वासाठीची स्पर्धा आहे," असं ते म्हणाले. 

Latest and Breaking News on NDTV

'AI मानवी क्षमतांचा विस्तार करेल'

"ज्याप्रमाणे औद्योगिक क्रांतीने जगाचा चेहरामोहरा बदलला, तसेच एआय मानवी क्षमतांचा विस्तार करेल. मात्र, एआयच्या क्षेत्रात भारत दुसऱ्या देशांच्या अल्गोरिदमवर अवलंबून राहू शकत नाही. जर आपल्याला जागतिक नेतृत्व करायचे असेल, तर आपली डेटा सुरक्षा आणि निर्णयक्षमता आपल्याच हातात हवी. परदेशी तंत्रज्ञानावर अवलंबून राहणे भविष्यात जोखमीचे ठरू शकते, असा धोक्याचा इशाराही यावेळी गौतम अदाणी यांनी दिला. 

"भारत सध्या एका निर्णायक टप्प्यावर उभा आहे. जिथे तंत्रज्ञान, प्रतिभा आणि राष्ट्रीय उद्देश यांनी हातात हात घालून चालणे आवश्यक आहे. लोकांची शक्ती, संस्थात्मक बांधणी आणि दीर्घकालीन दृष्टीकोन ही भारताची शक्ती आहे. याच स्पष्टतेने आता तरुण पिढीने एआय क्षेत्राकडे पाहिले पाहिजे. औद्योगिक क्रांतीपासून ते भारताच्या डिजिटल क्रांतीपर्यंत प्रत्येक मोठ्या तांत्रिक बदलाने मानवी क्षमतेचा विस्तारच केला आहे. एआय हे तंत्रज्ञान सामान्य नागरिकांच्या हातात बुद्धिमत्ता आणि उत्पादकता देईल, ज्यामुळे सर्व स्तरांतील तरुणांना विकासाच्या प्रवाहात सामील होता येईल, असंही ते म्हणाले. 

PCMC Election: ठाकरे गट शरद पवारांना धक्का देणार? 3 प्लॅन सांगत दिला अल्टिमेटम

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com