सुरज कसबे, पिंपरी चिंचवड:
PCMC Election 2026: राज्यात सध्या महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहराच्या राजकीय वर्तुळात सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी कोणती भूमिका घेणार? याबाबत सस्पेन्स कायम आहे. अशातच महाविकास आघाडीच्या महत्त्वपूर्ण बैठकीला शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दांडी मारल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
शरद पवार गटाची भूमिका काय?
पुणे तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसाठी राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. यावरुनच महाविकास आघाडीच्या गोटातही चर्चा रंगली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये मविआच्या बैठकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चांचे पडसाद या बैठकीत उमटले असून, ठाकरे गटाचे पुणे जिल्हा संपर्क प्रमुख सचिन अहीर यांनी शरद पवार गटाला स्पष्ट इशारा देत तीन पर्यायी प्लॅन तयार असल्याचे जाहीर केले आहे.
Maharashtra Politics: महायुतीला मोठा धक्का! राष्ट्रवादी स्वबळावर लढणार; जागा वाटपावरुन नाराजी
मविआचे 'तीन' प्लॅन तयार
बैठकीला शरद पवार गटाची अनुपस्थिती पाहता महाविकास आघाडीने आपली रणनीती स्पष्ट केली आहे. सचिन अहीर यांनी माध्यमांशी बोलताना खालील तीन पर्यायांचा खुलासा केला आहे. ज्यामध्ये प्लॅन 'A' म्हणजेच शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडी एकत्रित निवडणूक लढवणार आहे. प्लॅन 'B' जर शरद पवार यांची राष्ट्रवादी सोबत आली नाही, तर उर्वरित मित्रपक्ष एकत्र मिळून निवडणूक लढवतील. तर प्लॅन 'C': ठाकरे सेना आणि मनसे यांच्या युतीचा नवा पर्याय समोर ठेवण्यात आला आहे.
दरम्यान, ठाकरे गटाचे नेते सचिन अहीर यांनी आक्रमक पवित्रा घेत शरद पवार गटाला निर्वाणीचा इशारा दिला आहे. "शरद पवारांची राष्ट्रवादी सोबत आली तर ठीक, अन्यथा आम्ही थांबणार नाही. आम्ही आमच्या उमेदवारांची यादी आज संध्याकाळपर्यंत जाहीर करू," असे अहीर यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता शरद पवारांची राष्ट्रवादी नेमकी कोणती भूमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Bandur Andekar: बंडू आंदेकरची चलाखी.. अर्धवट अर्ज भरुन माघारी फिरला, नेमकं काय घडलं?
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world