Gold-Silver Rate: सोन्याच्या दरात 2000 रुपयांचा घसरण, चांदीही स्वस्त; काय आहेत आजचे दर?

जळगाव सुवर्णनगरीत आज जीएसटी विना सोन्याचे भाव 94 हजार 700 प्रति तोळा तर जीएसटीविना चांदीचे भाव 94 हजार 700 रुपये प्रति किलोवर आले आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins

मंगेश जोशी, जळगाव

Gold-Silver Price : शेअर बाजारातील तेजीदरम्यान सोन्याच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. गेल्या काही दिवसातं सोन्याच्या वाढलेल्या किमतीला काहीसा ब्रेक लागला आहे. सोन्याच्या भावात गेल्या दोन दिवसात 4 हजारांहून अधिकची तर चांदीच्या भावात 6 हजार रुपयांची घसरण झाली आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

आज देखील सराफा बाजार उघडताच सोन्याचे भाव हे 2 हजार रुपयांनी घसरून 94 हजार 700 रुपयांवर आले आहेत. सोन्याच्या पाठोपाठ चांदीचे भावही 94 हजार 700 रुपयांवर आले आले आहेत.  शनिवारी सोन्याचे दर  96 हजार 800 रुपये प्रति तोळे होते.

जळगाव सुवर्णनगरीत आज जीएसटी विना सोन्याचे भाव 94 हजार 700 प्रति तोळा तर जीएसटीविना चांदीचे भाव 94 हजार 700 रुपये प्रति किलोवर आले आहेत. तर जीएसटीसह सोन्याचे भाव 97 हजार 500 रुपये इतके आहेत. गेल्या अनेक वर्षानंतर सोने व चांदीचे भाव समांतर झाल्याचे पाहायला मिळत आहे. 

(नक्की वाचा-  Mobile App : हे 5 सरकारी अ‍ॅप तुमच्या मोबाईलमध्ये असायलाच हवेत! काय होईल फायदा?)

MCX एक्सचेंजवरही सोन्याच्या दरात घसरण

सोमवारी सकाळी, MCX एक्सचेंजवर 5 जून 2025 रोजी डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव 2.55 टक्क्यांनी किंवा २2458 रुपयांनी घसरून 94,060 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​व्यवहार करताना दिसला. तर 5 ऑगस्ट 2025 रोजी डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव 2.49 टक्क्यांनी किंवा 2422 रुपयांनी घसरून 94,771 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​व्यवहार करताना दिसला.

Advertisement

(नक्की वाचा- ATM Withdrawal : एटीएममधून पैसे काढणे महागले; 1 मे पासून नवा नियम लागू)

सोन्याची किंमत कशी ठरवली जाते?

आंतरराष्ट्रीय बाजारातील किमती, सरकारचे कर आणि रुपयाच्या मूल्यातील चढ-उतार अशा अनेक कारणांमुळे भारतात सोन्याच्या किमतीत बदल होतो. सोने हे केवळ गुंतवणुकीचे साधन नाही त्यासोबत भारतीयांचा भावनिक नातं आहे. लग्न आणि सणांमध्ये सोन्याची मागणीत मोठी वाढ होता.
 

Topics mentioned in this article