
APMC Hapus : आंबा हा केवळ फळांचाच राजा नाही तर आंबा नागरिकांच्या मनावर अधिराज्य करणारं फळ आहे. एप्रिल महिना उजाडला की घराघरांमध्ये आंब्याची चर्चा सुरू होते. अनेकजणं तर आधीच आंब्याचं बुकिंग करून ठेवतात. पुण्यात तर आंबा ईएमआयवर खरेदी करता येतो. अशा हा सर्वप्रिय आंबा यंदा सर्वसामान्यांच्या आवाक्यात असणार आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये हापूस आंब्याच्या पेट्यांची अक्षरशः बंपर आवक झाली आहे. तब्बल एक लाख हापूस आंब्याच्या पेट्या आज बाजारात दाखल झाल्यामुळे आंब्याच्या दरांमध्ये मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. नवी मुंबईच्या बाजारात आलेल्या 80 हजार पेट्या थेट कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागातून आल्या आहेत. तर उर्वरित 20 हजार पेट्या कर्नाटक आणि केरळ राज्यांसारख्या परराज्यातून दाखल झाल्या आहेत. परराज्यातील हापूस सध्या 60 ते 120 रुपये प्रति किलो दराने विकला जात आहे.
नक्की वाचा - IAA Olive Crown Awards 2025 : अदाणी समुह आणि पंखा चित्रपटाची प्रतिष्ठेच्या पुरस्कारात बाजी !
आता कोकणातील हापूसबद्दल बोलायचं झाल्यास, चार डझन पेटीचा दर आता 1500 ते 3500 रुपयांपर्यंत खाली आला आहे. त्यामुळे ज्या हापूसची चव घेण्यासाठी आत्तापर्यंत जास्त पैसे मोजावे लागत होते, तो आता सर्वसामान्यांच्या आवाक्यात आला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world