
भाजपचे दिवंगत नेते माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या तिन्ही कन्या सध्या राजकारणात सक्रिय आहे. पंकजा मुंडे आणि डॉ. प्रीतम मुंडे सध्या सक्रिय राजकारणात आहेत. त्यानंतर आता मुंडेंची तृतीय कन्या यशश्री मुंडेही (Munde's third daughter Yashashree Munde) सक्रिय राजकारणात पदार्पण करीत आहे. वैद्यनाथ अर्बन को-ऑपरेटिव बँक निवडणुकीतून (Vaidyanath Urban Co-operative Bank Election) त्या सक्रिय राजकारणात पदार्पण करीत आहे. पेशाने वकील असलेल्या यशश्री यांनी वैजनाथ बँक निवडणूक अर्ज दाखल केला आहे.
बीडमधील (Beed News) वैजनाथ बँक निवडणुकीची प्रक्रिया सध्या सुरू आहे. बँकेच्या एकूण 17 जागेसाठी ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. वैजनाथ बँक निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आजचा शेवटचा दिवस होता. आतापर्यंत 72 नाम निर्देशक अर्ज दाखल करण्यात आले आहेत. 14 जुलै रोजी अर्जाची छाननी होणार आहे. अर्ज मागे घेण्याची मुदत 15 जुलै ते 29 जुलैपर्यंत असणार आहे.
नक्की वाचा - Eknath Shinde in Delhi: मुंबईत अधिवेशन, एकनाथ शिंदे दिल्लीत? भाजप नेत्यांच्या भेटीगाठी होण्याची शक्यता
दिवंगत गोपीनाथ मुंडे यांची तिसरी कन्या यशश्री मुंडेंनी (Yashashree Munde) वैजनाथ बँक निवडणूक अर्ज दाखल केला आहे. माजी खासदार डॉक्टर प्रीतम मुंडे याही या निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. महिला प्रवर्गामध्ये अर्ज न आल्याने त्यांचा बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यशश्री मुंडे या वैद्यनाथ बँक निवडणुकीच्या निमित्ताने निवडणूक मैदानात लढताना पाहायला मिळणार आहे.
कोण आहेत यशश्री मुंडे?
यशश्री मुंडे यांनी वकिलीचं शिक्षण घेतलं आहे. पेशाने वकील असलेल्या यशश्री यांचा अमेरिकेतील कार्नेल विद्यापीठाकडून 'प्रॉमिसिंग आशियाई स्टुडंट' म्हणून गौरव करण्यात आला होता. इतक्या वर्षात त्या राजकारणात फारशा सक्रिय नव्हत्या. मात्र वैजनाथ बँक निवडणुकीच्या निमित्ताने त्यांचं लॉन्चिंग होणार असल्याचं म्हटलं जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world