मोहम्मद हमीद इंजिनियर हे नाव आता सर्वांच्या तोंडावर आहे. हमीद इंजिनिअर यांना नागपूरात झालेल्या दंगली प्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यामुळे हे हमीद इंजिनिअर कोण? याची चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे याच हमीद इंजिनिअर यांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली होती. त्यानंतर ते खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आले होते. त्या वेळच्या व्हिडीओ मध्ये देशभरातील मुस्लीम नेत्यांची ओळख हेच हमीद करू देताना दिसत आहे. मात्र आता त्यांनाच नागपूर दंगल प्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यामुळे हमीद यांची पार्श्वभूमी काय आहे? ते काय करतात? याचा आढावा आपण घेणार आहोत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
हमीद इंजिनिअर हे मायनॉरिटीज डेमोक्रेटिक पार्टी(MDP) संस्थापक आहे. सरकारी कर्मचारी ते राजकीय पक्षाचा नेता असा त्यांचा प्रवास राहीला आहे. त्यांनी सरकारी कर्मचारी म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. हमीद इंजिनियर हे सार्वजनिक बांधकाम विभागात नागपूरमध्ये कामाला होते. त्यावेळीच त्यांना इंजिनिअर हे टोपण नाव पडले होते. पुढे नागपुरातील एका मशिदीच्या नियंत्रणावरून त्यांनी आंदोलन केलेहोते. त्यावेळी ते खऱ्या अर्थाने चर्चेत आले. 2002 मध्ये त्यांचे इस्लामीक कट्टर पंथीयां बरोबर वाद झाले. त्यानंतर मुस्लीम सामाजात त्यांचे महत्व वाढू लागले.
ट्रेंडिंग बातमी - Emotional story: आई वडील भारतात, इंजिनिअर लेकाला मुस्लीम देशात अटक, प्रकरण काय?
हमीद इंजिनियर हे 60 वर्षाचे असून ते नागपूरचे रहिवासी आहेत. त्यांनी महाराष्ट्र सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागात (पीडब्ल्यूडी) अभियंता म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. तिथेच त्यांना "इंजिनियर" हे टोपणनाव मिळाले होते. पारंपरिक सुन्नी आणि सूफी प्रथांच्या जतनासाठी ते आग्रही होते. त्यासाठी त्यांनी अहले सुन्नत जमातचे समाजकार्य करण्यास 2002 मध्ये सुरूवात केली. नागपुरातील एका सुन्नी मशिदीचा ताबा परत मिळवण्यासाठी त्यांनी आंदोलन केले होते. या मशिदीचा ताबा तबलिगी जमातच्या सदस्यांनी घेतला होता. ज्यांच्याशी इंजिनियर यांनी दोन हात केले होते.
2002 मध्ये, मोमिनपुरा, नागपूर येथे एक सुन्नी मशीद होती, ज्याचा ताबा तबलिगी जमातीने घेतला होता. अहले सुन्नत जमातचे मशिदीवरील व्यवस्थापन टिकवण्यासाठी आम्ही लढा दिला, पण प्रशासनाचा कल राजकीय प्रभाव असलेल्या लोकांकडे असतो, हे आमच्या लक्षात आले. त्यामुळे इमान तंझीमची निर्मिती झाली, असे इंजिनियर यांनी त्यांच्या एका भाषणात म्हटले होते. 2002 मध्ये इंजिनियर यांनी स्थापन केलेली इमान तंझीम ही भारतातील बरेलवी सुन्नी पंथ आणि त्याची ओळख जतन करण्याच्या उद्देशाने स्थापन केलेली एक संघटना होती. बरेलवी चळवळ पैगंबर आणि सूफी यांच्याबद्दल खूप आदर ठेवते.
भारतातील बहुसंख्य मुस्लिमांचे प्रतिनिधित्व बरेलवी पंथ करत आहे. तरी सुन्नी इस्लामच्या देवबंदी पंथांइतके राजकीय महत्त्व याला नाही. गेल्या काही वर्षांत, इंजिनियर हे भारतातील प्रमुख मुस्लिम गटांचे, विशेषतः देवबंदी धर्मशास्त्रीय परंपरेचे पालन करणाऱ्या जमियत उलेमा-ए-हिंद आणि तबलिगी जमात या सारख्या संघटनांचे कट्टर विरोधक राहीले आहेत. त्यांची अनेकदा मौलाना अबुल कलाम आझाद यांच्यावर ही टीका केली आहे. आझाद यांनी बरेलवी विचारसरणीला प्रोत्साहन देण्यासाठी पुरेसे प्रयत्न केले नाहीत, असा आरोप इंजिनियर यांनी केला होता.
ट्रेंडिंग बातमी - Political news: 'जयंत पाटील किरकोळ माणूस', फडणवीसांचा लाडका आमदार 'हे' काय बोलला?
भारतीय मुस्लिमांमध्ये बहुसंख्य असूनही अहले सुन्नत जमातचा घटता राजकीय प्रभाव पाहून, इंजिनियर यांनी 2009 मध्ये MDP ची स्थापना केली. अहले सुन्नत जमातच्या अनुयायांना राजकीय व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा त्यांचा मुख्य उद्देश होता. "जो सूफी संतो की बात करेगा, वोही भारत पर राज करेगा म्हणजेच जो सूफी संतांबद्दल बोलेल, तोच भारतावर राज्य करेल ही त्यांच्या पक्षाची घोषणा होती. भारतीय इस्लाममध्ये सूफी मूल्ये आणि ओळख जतन करण्यावर त्यांचा भर होता. त्यांनी या पक्षाच्या माध्यमातून निवडणूक ही लढवल्या होत्या. या निवडणूका वेगवेगळ्या राज्यात त्यांनी लढवल्या.
2015 मध्ये इंजिनियर राष्ट्रीय पातळीवर प्रसिद्धीच्या झोतात आले होते. त्याला कारण ही तसेच होते. त्यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. मोदींनी ज्यावेळी पंतप्रधान पदाचा पदभार स्विकारला होता त्यावेळी त्यांनी सूफी लोकांशी संवाद साधला होता. त्यावेळी मुस्लिम समुदायाच्या नेत्यांच्या पहिल्या शिष्टमंडळात इंजिनिअर यांचा सहभाग होता. या बैठकीच्या एका व्हिडिओमध्ये, इंजिनियर शिष्टमंडळातील इतर सदस्यांची पंतप्रधानांशी ओळख करून देताना दिसत होते. चर्चेदरम्यान, इंजिनियर यांनी भारतातील तसेच प्रमुख सुन्नी संस्थांमधील वहाबी विचारसरणीच्या वाढत्या प्रभावाबाबत चिंता व्यक्त केली होती. त्याचे संभाव्य धोके ही मोदींना सांगितले होते.
सुन्नी वक्फ बोर्डावर एका कट्टर विचारसरणीचे वर्चस्व झाले आहे. अनेक सुन्नी संस्थांवर कब्जा करण्यात आला आहे. जिथे अतिरेकी विचारसरणीला प्रोत्साहन दिले जात आहे. ही विचारसरणी भारतात रुजली, तर ती देशासाठी खूप धोकादायक ठरेल. असं ते या बैठकी बोलले होते. शिवाय पंतप्रधान मोदींना सुन्नी वक्फ बोर्डाचे व्यवस्थापन अहले सुन्नतुल जमातला द्यावे अशी मागणी केली होती असं त्यांनी त्यावेळी सांगितलं होतं. वहाबींना त्यांचा स्वतःचा वहाबी वक्फ बोर्ड स्थापन करू द्या," असे इंजिनियर यांनी पंतप्रधान मोदींना सांगितले होते. तेव्हापासून, MDP ने महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात निवडणुका लढवल्या, परंतु त्यांना कोणतीही महत्त्वपूर्ण राजकीय लाभ झाला नाही.
दरम्यान नागपूरात औरंगजेबाच्या कबरीबाबत एका आंदोलन करण्यात आलं. त्यानंतर नागपूरात दंगल उसळली. या दंगलीसाठी चिथावणी दिल्याचा आरोप हा हमीद इंजिनिअर यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यांच्या चिथावणीमुळे नागपूरात हिंसाचार उसळल्याचं पोलिसांचे म्हणणे आहे. त्यामुळे इंजिनिअर यांना अटक करण्यात आली आहे. तेव्हापासून अटक करण्यात आलेले हमीद इंजिनिअर कोण याची चर्चा सुरू झाली होती.