
नातं म्हणलं तर ते जिवापाड जपलं जातं. मग ते आई वडील, भावा भावाचं असो की भाऊ बहीणीचं असो. ही नाती सर्व नात्याच्या पलीकडची असतात. पण याच नात्याला काही जण डाग लावण्याचं काम करतात. त्यामुळे नात्यावरूनही अनेकांचा विश्वास उडून जाते. तशीच सर्वांना हादरवून सोडणारी घटना हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी इथं घडली आहे. या घटनेनं सर्वच जण हादरून गेले आहेत. शिवाय सख्खा भाव आपल्या सख्ख्या मोठ्या भावा बरोबर असं काही भयंकर करू शकतो का? याची चर्चा सगळीकडे रंगली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
ही अंगावर काटा आणणारी भयंकर घटना हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील दाती या गावात घडली आहे. या गावात अशोक सुर्यवंशी आणि रामराव सुर्यवंशी हे दोघे सख्खे भाव राहात होते. अशोक हा मोठा तर रामराव हा छोटा भाऊ होता. गावात या दोघांची वडीलोपार्जीत शेती होती. याच शेतीवरून या दोघांमध्या वाद होता. शिवाय पैशाच्या देवाण घेवाण वरून ही त्यांच्यात सतत भांडणं ही होत होती.
मात्र हे भांडण अगदी टोकाला गेलं. ते इतकं की भाऊ भावाच्या जीवावर उठवा. त्यातूनच लहान भावाने भयंकर कृत्य करण्याचा निर्णय घेतला. त्याने मोठा भाऊ असलेल्या अशोक यांच्यावर धारधार शस्त्राने वार केला. तेवढ्यावर भागलं नाही म्हणून त्याच्यावर लाकडाने हल्ला केला. या हल्ल्यात अशोक यांचा जागीच मृत्यू झाला. भावालाच खल्लास केल्यानंतर रामरावने तिथून पळ काढला. झालेल्या घटनेची माहिती पोलिसांना मिळाली.
ट्रेंडिंग बातमी - Political news: 'जयंत पाटील किरकोळ माणूस', फडणवीसांचा लाडका आमदार 'हे' काय बोलला?
त्यानंतर आखाडा बाळापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.शिवाय आरोपी रामराव याला ही अटक करण्यात आली आहे. या घटनेनंतर आणखी एक बाब समोर आली आहे. जमीनीच्या वादातूनच मृत अशोक सुर्यवंशी यांच्या पत्नीचीही हत्या करण्यात आली होती. दरम्यान या घटनेनं संपूर्ण गाव हादरून गेलं आहे. शिवाय भावाने भावाचा खून केल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world