जाहिरात

Jalna News: एका घटनेमुळं जालन्यात शुकशुकाट, नामांकित शाळेच्या विरोधात विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये संतापाची लाट

जालना शहरातील एका नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील शिक्षकाने 14 वर्षाच्या विद्यार्थीनीवर अत्याच्यार केल्याची संतापजनक घटना घडली.

Jalna News: एका घटनेमुळं जालन्यात शुकशुकाट, नामांकित शाळेच्या विरोधात विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये संतापाची लाट
Jalna School Girl Physical Assault Case

लक्ष्मण सोळुंके, प्रतिनिधी 

Jalna Crime News Today : जालना शहरातील एका नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील शिक्षकाने 14 वर्षाच्या विद्यार्थीनीवर अत्याच्यार केल्याची संतापजनक घटना घडली.या प्रकरणी पालकांच्या तक्रारीवरून कदिम जालना पोलिस ठाण्यात आरोपी शिक्षका विरुद्ध बलात्कार आणि पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी आरोपी शिक्षकाला अटकही केली आहे.विक्की शिंदे असं अटक केलेल्या शिक्षकाचं नाव आहे. 

एका वर्षापूर्वी शिक्षकासोबत ओळख झाली आणि..

पीडित विद्यार्थिनीची शाळेत एका वर्षापूर्वी शिक्षकासोबत ओळख झाली होती. त्यानंतर त्यांच्यात जवळीक वाढली. त्यानंतर शिक्षकाने विद्यार्थिनीला भेटायला बोलावलं आणि तिच्यावर अत्याचार केला. एक महिन्यानंतर पुन्हा एकदा संबंध ठेवण्यासाठी शिक्षक आग्रह करत असल्याने पीडित विद्यार्थीनी मोठ्या मानसिक तणावात होती.तिने घडलेला सर्व प्रकार तिच्या आईला सांगितला.

नक्की वाचा >> Sindhudurg News : फोंडा घाटात मित्राचा मृतदेह अन् दुचाकी फेकली, रात्री सर्वांनी मिळून रचला होता मोठा कट

त्यानंतर आई आणि वडिलांच्या तक्रारीवरून कदीम जालना पोलिस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. आणि पोलिसांनी आरोपी शिंदेला बेड्या ठोकल्या. शिंदेला सहा महिन्यांपूर्वीच शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील एका नामांकित इंग्रजी शाळेतून काढून टाकले होते, अशी माहिती समोर आली आहे.याप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. या घटनेमुळं शहरात संतापाची लाट पसरली आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com