
नागिंद मोरे, धुळे:
Maharashtra monkeypox Virus Case: जगभरात थैमान घालणाऱ्या मंकी पॉक्सचा राज्यातील पहिला रुग्ण धुळ्यात आढळून आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. रुग्णाचे दोन्ही रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याने हिरे शासकीय जिल्हा रुग्णालय प्रशासनही सतर्क झाले आहे. मंकी पॉक्स हा संसर्गजन्य आजार असल्याने रुग्णाला स्वतंत्र विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले असून त्याच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्यासाठी महापालिकेला कळविण्यात आले आहे. तसेच जिल्हाधिकाऱ्यांनाही याबाबत सुचित करण्यात आले आहे.
धुळ्यात आढळला पहिला रुग्ण
मंकी पॉक्स बाधित रुग्ण 2 ऑक्टोबर रोजी तो सौदी अरेबियाहून धुळ्यातील गरीब नवाज नगर येथे आला होता. गेल्या चार वर्षांपासून तो सौदी अरेबियात वास्तव्यास आहे. त्याच्या मुलीचे लग्न असल्याने तो धुळ्यात आला होता. मात्र, येथे आल्यानंतर त्याला त्वचेचा त्रास जाणवू लागला. त्यामुळे तो दि. ३ ऑक्टोबर रोजी हिरे रुग्णालयात तपासणीसाठी गेला.
या रुग्णाने हिरे रुग्णालयातील डॉक्टरांना आपला त्रास सांगितला. डॉक्टरांना मंकी पॉक्सची लक्षणे दिसून आल्याने मनपाच्या पथकाने सदर रुग्णाच्या रक्ताचे नमूने घेतले होते. सदर सॅम्पल पुण्यातील एनआयव्हीकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. या रुग्णाचा मंक्सी पॉक्सचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला. डॉक्टरांनी शंकेचे निरसन करण्यासाठी पुन्हा रक्ताचे नमूने तपासणीसाठी पाठविले होते.
धुळ्यात आढळलेला मंकी पॉक्सचा रुग्ण हा महाराष्ट्रातील पहिलाच रुग्ण असल्याचे पुण्यातील एनआयव्हीने स्पष्ट केले आहे. मंकी पॉक्समध्ये दोन प्रकारचे व्हेरीयंट आहेत. त्यात क्लायड -१ हा दुर्मिळ व अधिक संसर्गजन्य असतो. भारतात आतापर्यंत याचे ३५ रुग्ण आढळले आहेत. तर महाराष्ट्रातील ही पहिलीच केस आहे. सदर रुग्णाला डायबेटीज असल्याने बरा होण्यासाठी वेळ लागत आहे. मंकी पॉक्स आजार पसरु नये म्हणून महापालिका व जिल्हाधिकारी यांना कळविले असल्याची माहिती रुग्णालयाने दिली आहे.
मंकीपॉक्सची लक्षणे| Monkeypox Symptoms
- त्वचेवर पुरळ (Skin Rash): शरीरावर लाल पुरळ येणे, ज्याचे हळूहळू फोडांमध्ये रूपांतर होते. हे फोड चेहऱ्यावर, हातांवर, पायांवर आणि जननेंद्रियाच्या भागात (genital area) दिसू शकतात.
- ताप (Fever): शरीराचे तापमान वाढते.
- डोकेदुखी (Headache): तीव्र डोकेदुखी जाणवते.
- थकवा (Fatigue): शरीर खूप थकल्यासारखे वाटते.
- स्नायू आणि अंगदुखी (Muscle and Body Aches): शरीराच्या स्नायूंमध्ये वेदना आणि अंगदुखी जाणवते.
आजाराचा प्रतिबंध आणि घ्यायची काळजी| Prevention
- हात धुणे: साबण आणि पाण्याने किंवा अल्कोहोल-आधारित हँड सॅनिटायझरने (hand sanitizer) वारंवार हात धुवा.
- संपर्क टाळणे: मंकीपॉक्सची लागण झालेल्या व्यक्तींच्या जवळचा शारीरिक संपर्क टाळा, तसेच त्यांच्या कपड्यांसारख्या वस्तू वापरू नका.
- लसीकरण (Vaccination): मंकीपॉक्ससाठी JYNNEOS नावाची लस (vaccine) उपलब्ध आहे. ज्यांना आजाराचा जास्त धोका आहे (उदा. आरोग्य कर्मचारी), त्यांनी ही लस घ्यावी.
- प्रवास करताना सावधगिरी: परदेश प्रवास करताना, विशेषतः आफ्रिकेसारख्या जास्त धोका असलेल्या ठिकाणी जाताना, पुरेशी खबरदारी घ्या.
Pune News: गावगुंडाची दहशत, शहरात पुन्हा वाहनांची तोडफोड, थरारक CCTV आला पुढे
जागतिक आरोग्य संघटनेची भूमिका
जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) ऑगस्ट २०२४ मध्ये पुन्हा एकदा मंकीपॉक्ससाठी सार्वजनिक आरोग्य आणीबाणी (Public Health Emergency) जाहीर केली होती. तथापि, त्यावेळी तुलनेने कमी रुग्ण आढळल्यामुळे या आणीबाणीची तीव्रता कमी करण्यात आली होती. सध्या जागतिक स्तरावर मंकीपॉक्सच्या रुग्णांची संख्या कमी झाली असली, तरी सतर्क राहणे आणि आवश्यक काळजी घेणे महत्त्वाचे आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world