4 days ago

विदर्भात उष्णतेची लाट येणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला. अकोला, बुलढाणा, अमरावती, यवतमाळ, नागपूर विदर्भातल्या या जिल्ह्यांमध्ये तापमान 42 अंशांच्या पुढे गेलंय. गेल्या दोन दिवसांपासून गुजरात आणि उत्तर-पश्चिमेकडून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे विदर्भात तापमानात वाढ झाली आहे. मागील आठवड्यात ढगाळ वातावरण आणि काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसामुळे तापमानात थोडीशी घट झाली होती. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा एकदा तापमान वाढू लागलंय.

Apr 09, 2025 22:54 (IST)

नवी मुंबईच्या बिल्डरवर चेंबूर मध्ये गोळीबार

नवी मुंबईच्या बिल्डरवर चेंबूर मध्ये गोळीबार झाल्याची घटना घडली आहे.  बाईक वरून आलेल्या दोन अज्ञाताकडून हा गोळीबार झाला.   गोळीबारामध्ये कुणीही जखमी झालं नसल्याची माहिती समोर येत आहे.  

चेंबूर पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. 

Apr 09, 2025 20:19 (IST)

BMC च्या सहायक लिपिक पदाची तात्पुरती यादी जाहीर

बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये कार्यकारी सहायक (लिपिक) पदाच्या १ हजार ८४६ जागांच्या भरतीसाठी दिनांक ०२ डिसेंबर ते दिनांक १२ डिसेंबर २०२४ या दरम्यान घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या तसेच निवडीच्या निकषानुसार निवड झालेल्या उमेदवारांची शैक्षणिक प्रमाणपत्र व इतर कागदपत्रांच्या पडताळणीसापेक्ष तात्पुरती निवड यादी जाहीर करण्यात आली आहे. 

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या https://portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर Recruitment>Chief Personnel Officer>Executive Assistant-Direct Recruitment-2024 online Exam-Temporary Common Select List येथे सदर तात्पुरती निवड यादी उपलब्ध आहे. 

 

शैक्षणिक प्रमाणपत्र व इतर कागदपत्रांच्या पडताळणीचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर https://portal.mcgm.gov.in या महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर त्याची माहिती देण्यात येईल.

Apr 09, 2025 19:08 (IST)

IPL 2025 GT vs RR : राजस्थान रॉयल्सचा कॅप्टन संजू सॅमसननं टॉस जिंकला

आयपीएलमध्ये आज (9 एप्रिल) गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना होत आहे. या सामन्यात राजस्थानचा कॅप्टन संजू सॅमसननं टॉस जिंकला असून पहिल्यांदा फिल्डिंगचा निर्णय घेतलाय.

Apr 09, 2025 18:31 (IST)

पतीच्या वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात आलेल्या महिलेला कारने चिरडलं

पालघरच्या बोईसर येथील BARC (तारापूर अनुविद्युत केंद्र रहिवासी संकुल) मधे  एका डॉक्टरने वृद्ध महिलेला चिरडल्याची  धक्कादायक घटना घडली आहे. BARC च्या रुग्णालयातील डॉक्टर ए . के. दास याचं गाडीवरून नियंत्रण सुटल्याने रुग्णालयातून बाहेर येणाऱ्या वृद्ध महिलेला त्यांनी चिरडलं . पतीच्या वैद्यकीय तपासणीसाठी ही महिला रुग्णालयात आली होती. छायालता विश्वनाथ आरेकर वय वर्ष 73 असं त्याचं नाव आहे. 

Advertisement
Apr 09, 2025 16:57 (IST)

Live Update : प्रशांत कोरटकरला दिलासा, जामीन अर्ज मंजूर

प्रशांत कोरटकरला दिलासा मिळाला आहे. त्याला जामीन अर्ज मंजूर करण्यात आला आहे. कोल्हापूरच्या सत्र न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. तो गेल्या काही दिवसापासून न्यायालयीन कोठडीत होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती. 

Apr 09, 2025 16:50 (IST)

तसा नदीत बुडून मुलगा आईसह तिघांचा दुर्दैवी मृत्यु

भातसा नदीत बुडून मुलगा आईसह तिघांचा दुर्दैवी मृत्यु झाला आहे.  शहापूरातील वाफे हद्दीतील भातसा नदीत ही घटना घडली  शहापूर शहराजवळील वाफे हद्दीतील भातसा नदीकाठी दुपारच्या सुमारास दोन महिलासह एक मुलगा नदीवर कपडे धुवायला गेले होते.मात्र तोल गेल्याने पाण्यात बुडून तिघांचा मृत्यू झाला आहे. तिघेही शहापूर जवळील राहणारे असल्यामुळे घटनास्थळी मोठी प्रमाणात गर्दी झाली होती. वनिता सुदर्शन शेळके वय 33, लक्ष्मी दत्तात्रय पाटील वय 50 आणि  

धिरज दत्तात्रय पाटील वय 17 अशी मृत्यांची नावं आहेत. 

Advertisement
Apr 09, 2025 14:35 (IST)

Live Update : नागपूर महानगरपालिकेकडून हिट ॲक्शन प्लान राबवण्यास सुरुवात

वाढत्या उकाड्याच्या पार्श्वभुमीवर नागपूर महानगरपालिकेने हिट ॲक्शन प्लान राबवायला सुरुवात केली आहे. शहरातल्या ट्रॅफिक सिग्नलवर ग्रीन नेट लावून दुचाकीस्वारांना सावली मिळेल, त्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त अभिजीत चौधरी यांनी सांगितलं. बेघर आणि रस्त्यावर फिरणाऱ्या भिक्षेकरू लोकांसाठी महानगरपालिकेच्या निवारा केंद्रात त्यांची व्यवस्था करण्यात असल्याचे महानगरपालिकेच्या वतीने सांगण्यात आले आहे. शहरातील सर्व उद्याने दिवसभर उघडी ठेवली जाणार असून 600 च्या वर ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. 

Apr 09, 2025 12:23 (IST)

Live Update : लातूर शहराचा पाणीपुरवठा लांबला! 4 ऐवजी आता 8 दिवसाला येणार पाणी

लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा प्रकल्पातून पिवळे पाणी येत असल्यामुळे शहराचा पाणीपुरवठा लांबला आहे. दोन पंपाऐवजी एका पंपातून पाण्याची उचल केली जात असल्याने चार दिवसाऐवजी आता आठ दिवसाला पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे लातूर शहरवासीयांना पाणी असून गैरसोय होत आहे. लातूर शहरासाठी दररोज 50 ते 55 एमएलडी पाणी मांजरा प्रकल्पातून उचलले जाते.  त्यासाठी प्रकल्पावर दोन पंप सुरू कराव्या लागतात.. मात्र दोन पंप लावल्यानंतर प्रकल्पातील पाण्याची उसळी होत आहे ..परिणामी लातूर शहरात पिवळे पाणी येते त्यामुळे एकाच पंपातून पाण्याची उचल केली जात आहे परिणामी लातूर शहरात पाणीपुरवठा चार दिवसा ऐवजी आठ दिवसात करावा लागत आहे शहरातील अनेक भागांमध्ये गेल्या आठ दिवसापासून पाणीपुरवठा नाही याकडे पाणीपुरवठा विभागाने दुर्लक्ष केले आहे मांजरा प्रकल्पात मोठा पाणीसाठा असताना सुद्धा या ना त्या  कारणामुळे लातूर शहरवासियाना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे...

Advertisement
Apr 09, 2025 11:08 (IST)

Live Update : शेगाव बस स्थानकासमोर दोन काळी पिवळी मॅजिक वाहनं अज्ञात इसमाने पेटवलं

शेगाव बस स्थानकासमोर उभ्या करून ठेवलेल्या दोन काळी पिवळी मॅजिक वाहनांना अज्ञात इसमाने आज पहाटेच्या सुमारास आग लावून पेटवून दिले. या घटनेत दोन्ही वाहने जळून खाक झाली आहेत. संत नगरी शेगावच्या बस स्थानकावर मागील काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्याचाच हा परिणाम असल्याचा सूर नागरिकांमधून येत आहे. शेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार नितीन पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू केली आहे

Apr 09, 2025 09:02 (IST)

Live Update : सतीश भोसले उर्फ खोक्या याच्या जामीन अर्जावर आज सुनावणी

सतीश भोसले उर्फ खोक्या याच्या जामीन अर्जावर आज सुनावणी पार पडणार आहे. बीड जिल्हा न्यायालयात खोक्याचे वकील ॲड. शशिकांत सावंत यांनी हा जामीन अर्ज दाखल केला आहे. दुपारी 2.45 नंतर ही सुनावणी होणार आहे. दरम्यान सतीश भोसले उर्फ खोक्यावर वेगवेगळे 3 गुन्हे दाखल झाले आहेत. याच गुन्ह्यात ही सुनावणी असणार आहे, असं देखील सावंत यांनी सांगितलं आहे.

Apr 09, 2025 08:42 (IST)

Live Update : पुणे पोलीस आयुक्तालयातील बेवारस वाहनांचा लिलाव

पुणे पोलीस आयुक्तालयातील बेवारस वाहनांचा लिलाव 

पुणे शहरातील 39 पोलीस स्टेशन गुन्हे शाखा वाहतूक पोलीस विभाग याच्यात बेवारस पडलेल्या वाहनांचा  लिलाव केला. यामध्ये एकूण 962 वाहनांचा ई लिलाव करण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या शंभर दिवसाच्या कार्यक्रमांमध्ये याचाही समावेश होता. ज्या पोलीस स्टेशनच्या परिसरात अशा प्रकारची वाहने वर्षांवर्षे पडून आहेत. त्यांचा लिलाव करण्यात आला

Apr 09, 2025 07:29 (IST)

Live Update : माळशिरस तालुक्यात एक दिवस दाखल्यांसाठी, प्रशासनाची विशेष मोहीम

फडणवीस सरकारच्या शंभर दिवसाच्या कृती आराखडा अंतर्गत एक दिवस दाखल्यांचा ही मोहीम माळशिरस तालुक्यात राबवण्यात आली. माळशिरस तालुक्यातील पूर्व भागात असणाऱ्या दुष्काळी पट्ट्यामध्ये एक दिवस दाखल्यांसाठी चा कार्यक्रम घेण्यात आला.. विशेष म्हणजे दाखले काढण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली. सर्व दाखले एकाच ठिकाणी देण्याची व्यवस्था या निमित्ताने प्रशासनाबाबत करण्यात आले

Apr 09, 2025 07:27 (IST)

Live Update : जळगावात तापमानाचा पारा 43.3 अंशावर

जळगाव जिल्ह्यात तापमानाचा पारा हा चांगलाच वाढला असून मंगळवारी जळगाव शहरात 43.3 अंश तापमानाची नोंद झाली असून तर जिल्ह्यातील हॉट सिटी म्हणून ओळख असलेल्या भुसावळ शहरात 45.8 अंश तापमानाची नोंद झाली आहे. राजस्थानातील वाळवंटी प्रदेशातील उष्ण वारे व मध्य प्रदेशातील मालवा प्रदेशातील कोरडे वारे ताशी 15 ते 20 किलोमीटर वाहत असल्याने तर दुसरीकडे सूर्यकिरणे थेट जमिनीवर पडत असल्याने जिल्ह्याचा पारा वाढला असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे. तर आज जळगाव तापमानात पुन्हा एक ते दीड वर्षांनी वाढ होण्याचा अंदाजही हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे.