देशातील अनेक राज्यांमध्ये नागरिकांना Heat Wave चा त्रास सहन करावा लागत आहे. हवामान विभागाकडून अनेक ठिकाणी सावधानतेचा इशारा दिला आहे. बिहार, ओडिसा, केरळ या राज्यांमध्ये नागरिकांना भीषण उष्णतेचा सामना करावा लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील उत्तर कोकणात उद्या उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला असून तापमानाचा पारा 40 ते 42 अंशावर जाण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. उत्तर कोकणासह विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा अंदाज असल्याने नागरिकांनी अधिक काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
Heat wave मध्ये काय काळजी घ्याल...
- तहान लागली नसली तरीही पाणी पित राहा.
- प्रवासादरम्यान पिण्याचं पाणी सोबत ठेवा.
- ORS चं पाणी प्या, लिंबू पाणी, ताक-लस्सी, फळांचा रस, नारळाचं पाणी यांसारख्या पेयांचं आहारातील प्रमाण वाढवा.
- पातळ, सैल, सुती आणि शक्यतो हलक्या रंगाचे कपडे वापरा.
- थेट सुर्यप्रकाशाच्या संपर्कात असताना छत्री, टोपी, टॉवेल आणि इतर साधनांचा वापर करा.
- उन्हात बाहेर जाताना चप्पल वा शूज वापरा.
- भारतीय हवामान विभागाचे संकेतस्थळ https://mausam.imd.gov.in/ येथून हवामानाची अद्ययावत माहिती घ्या.
- थेट सुर्यप्रकाशाच्या लाटा रोखण्यासाठी दिवसा खिडक्यांवर पडदे लावा.
- घराबाहेर कामे शक्यतो सकाळ किंवा सायंकाळी उरकून घ्या. आवश्यकता नसेल तर दुपारी घराबाहेर जाणं टाळा.
जास्त जोखीम असलेल्यांसाठी सूचना...
- ज्यांना उष्णतेसंबंधित आजाराचा त्रास होऊ शकतो त्यांनी अधिक लक्ष द्यावं.
- यामध्ये शारीरिकदृष्ट्या आजारी, विशेषत: हृदयरोग किंवा उच्च रक्तदाब
- थंड हवामानातून उष्ण हवामानात येणाऱ्या प्रवाशांनी शरीराला उष्णतेशी अनुकून होण्यासाठी एक आठवड्याचा वेळ द्यावा. यावेळी जास्त श्रम टाळावेत आणि भरपूर पाणी प्यावे.
नक्की वाचा - मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर बर्निंग बसचा थरार, बसमध्ये होते 36 प्रवासी; पुढे काय घडले?
वृद्धांसाठी खबरदारी...
- एकटे राहणाऱ्या वृद्ध वा आजारी व्यक्तींच्या आरोग्याचे दररोज निरीक्षण करा.
- तुमचं घर थंड ठेवा. पडदे, शटर किंवा सनशेड वापरा आणि रात्री खिडक्या उघडा.
- शरीर थंड करण्यासाठी स्प्रे बाटल्या, पंखा, ओलसर कापड आणि बर्फाचे टॉवेल वापरा.
- पाण्यात पाय बुडवल्याने निर्जलीकरण आणि शरीराची उष्णतेमुळे होणारी अस्वस्थता कमी होऊन जलद थंडावा मिळतो.