Maharashtra Rain Update : गेल्या कित्येक दिवसांपासून कोकणाला पावसाने झोडपून काढलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाल्याचं पाहायला (Heavy rain in kokan) मिळत आहे. जिल्ह्यात सरीवर कोसळणा-या पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाली आहे. खेडची जगबुडी नदी तर राजापूरची कोदवली नदी सध्या इशारा पातळीपर्यंत पोहोचली आहे.
खेडच्या जगबुडी नदीची सध्याची पाणीपातळी 5.40.मीटर इतकी पोहोचली आहे. तर कोदवलीची पाणी पातळी 5.70 मीटर इतकी आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज पहाटे पासूनच पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असल्याने नद्यांना पूरस्थिती निर्माण झाली आहे. सह्याद्री पट्ट्यात मुसळधार पाऊस झाल्याने भंगसाळ नदीचे पाणी कुडाळ शहरात घुसले असून त्यामुळे शहरात जाण्याचा मार्ग बंद आहे.
नक्की वाचा - Mumbai News: अदृश्य शक्तीचा भास झाल्याने समुद्रात उडी; बुडणाऱ्या महिलेला पोलीस कर्मचाऱ्याने वाचवले!
तर नजीकच्या पावशी, वेताळ बांबर्डे येथे सुद्धा पुरस्थिती निर्माण झाली आहे. मुंबई गोवा महामार्गावर गाड्यांचा वेग मंदावलेला असून शेती पूर्णपणे पाण्याखाली गेली आहे. दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळा काल ३ जुलै रोजी लवकर सोडण्यात आल्या होत्या. पुढील काही तास असाच पाऊस सुरू राहिला तर जनजीवन विस्कळीत होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दुसरीकडे कोकणातील दोन (Ratnagiri and Raigad Orange Alert) जिल्ह्यांना हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना हवामान विभागाकडून अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्याला आज पावसाचा आँरेज अलर्ट आहे. समुद्रातील लाटांच्या तडाख्याने मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधारा खचत चालला आहे. नव्याने होणाऱ्या बंधाऱ्याला समुद्री उधाणाचा दणका जाणवत आहे.
मुंबई उपनगरात पाऊस...
दुसरीकडे मुंबईत पावसाची लपाछुपी सुरू असून उपनगरात मात्र पावसाची रिमझिम सुरूच आहे. कल्याण, बदलापूर या भागात पावसाची बॅटिंग पाहायला मिळत आहे.